पुणे

नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी आज मतदान

CD

पुणे, ता. १ ः जिल्ह्यातील बारा नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी मंगळवारी (ता. २) मतदान होत आहे. सोमवारी प्रचाराचा अखेरचा दिवस होता. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्व पक्षांच्या विविध नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या. स्थानिक स्वराज्य संस्थेवर सत्ता मिळविण्यासाठी ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. बारामती आणि फुरसुंगी-उरुळी देवाची येथे निवडणूक स्थगित झाल्याने या दोन्ही ठिकाणी मतदान होणार नाही.
पुण्यात चौदा नगर परिषद आणि तीन नगरपंचायतींची निवडणूक जाहीर करण्यात आली. मात्र, न्यायालयीन अपिलांचे कारण देत निवडणूक आयोगाकडून दोन ठिकाणची पूर्ण निवडणूक, तर तळेगाव दाभाडे, दौंड, लोणावळा आणि सासवड येथील सदस्यपदाच्या दहा जागांची निवडणूक स्थगित केली आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे कार्यक्रमाची आखणी होणार असून, २० डिसेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान, बारामती आणि फुरसुंगी-उरुळी देवाची आणि इतर चार नगर परिषदांत दहा जागांची निवडणूक स्थगित केल्याने, उर्वरित जागांसाठी एकूण एक हजार २६४ सदस्यपदाचे आणि ९६ नगराध्यक्षपदाचे उमेदवार रिंगणात आहेत. इंदापूर, दौंड, भोर, शिरूसह अन्य ठिकाणी निवडणूक अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चेची ठरलेल्या इंदापूर नगर परिषद निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंदापूरसह इतरही ठिकाणी पक्षांकडून स्थानिक नेत्यांच्या विरोधात निवडणूक लढवली जात आहे.

मतमोजणी उद्याच...
नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी मंगळवारी मतदान झाल्यानंतर बुधवारी (ता. ३) लगेच मतमोजणी होणार आहे; तर पुढे ढकललेल्या ठिकाणी २० डिसेंबरला मतदान होईल आणि २१ डिसेंबरला मतमोजणी केली जाईल. स्थगित केलेल्या निवडणुकांव्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणांचा मूळ निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने पूर्वीप्रमाणेच ठेवला आहे.

आमदारांची प्रतिष्ठा पणाला...
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत प्रबळ दावेदार मानले जात असलेल्यांचा पराभव झाला. आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नगर परिषद, नगरपंचायतीमध्ये आपल्या विचारांची सत्ता, नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी हे सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आजी-माजी आमदार एकमेकांवर चिखलफेक करताना अधिक प्रमाणात दिसले.


अखेरचा दिवस शक्तिप्रदर्शनाचा...
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी विविध भागांत सभा घेतल्या. काही ठिकाणी मंत्र्यांनी आणि प्रमुख नेत्यांनीही उमेदवारांच्या प्रचारार्थ दौरे केले. प्रचाराबरोबर नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनाची संधी सोडली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना फटका! बेसा येथील उपलांचीवार कुटुंबासह अनेक नागरिक अबुधाबीत अडकले; विमानसेवा रद्द झाल्याने परतीचा प्रवास थांबला

Mumbai ATS Raid : मुंबईत एटीएसच्या धाडी; महत्वाच्या तीन ठिकाणी धाड; इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया संघटनेचे कनेक्शन

Vasai Accident: शिकाऊ चालकानं ब्रेकऐवजी एक्सेलेटर दाबला; कारनं ९ जणांना उडवलं; वसईत होळीच्या रात्री थरार

Latest Marathi News Live Update : इंडोनेशियामध्ये ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

Viral Video: आश्चर्यकारक तपश्चर्या! होळीच्या धगधगत्या ज्वालांमध्ये तो थेट उतरला… पुढे जे घडलं ते पाहून सगळे थक्क

SCROLL FOR NEXT