पुणे

शिक्षण उपनिरीक्षकाला न्यायालयीन कोठडी

CD

पुणे, ता. २ : विना वेतन काम करणाऱ्या एका शिक्षिकेचा ‘शालार्थ आयडी’ मंजूर करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केलेल्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब भगवान मिरगणे (वय ५७, रा. हडपसर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (ता. २५) अटक केली होती. कारवाईदरम्यान त्याच्या बॅगेतून एक लाख २० हजार रुपये जप्त करण्यात आले, त्याच्या हडपसर येथील ग्रीनव्हील सोसायटीमधील घराच्या झडतीमधून ५६ हजार रुपयांची रोकड आढळून आली होती. दरम्यान, त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्याला सोमवारी (ता. १) न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. त्यानंतर मिरगणे याने ॲड. मिलिंद पवार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर बुधवारी (ता. ३) सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran India Oil Supply : इराणकडून भारतात येणारा ‘होर्मुझ’ सामुद्रमार्ग बंद, फक्त ४५ दिवसांचा इंधनसाठा; केपलर संस्थेची माहिती

सेपरेशन एन्झायटी डिसऑर्डर शाळा, पालकांची जबाबदारी

आजचे राशिभविष्य - 04 मार्च 2026

मोठी बातमी! ‘एनए’ परवाना, नॉन-क्रीमिलेअर, जातीचा दाखला गावातच मिळणार; जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार गावात येणार; ‘या’ १६ सुविधा गावातच मिळणार

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

SCROLL FOR NEXT