पुणे

सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

CD

पुणे, ता. १ : शहरातील पादचारी आणि दुचाकीस्वारांना धमकावून सोनसाखळी, मोबाईल आणि दुचाकी लुटणाऱ्या सराईत चोरट्यास आंबेगाव पोलिसांनी अटक केली. तपासात आरोपीने पाच गुन्हे केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दागिने आणि दुचाकीसह चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आकाश नरहरी शिंदे (वय २७, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रूक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कात्रजमधील गुजरवाडी भागात आरोपी शिंदेने एका दुचाकीस्वाराला धमकावून त्याच्याकडील मोबाईल आणि दुचाकी पळवून नेली होती. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. दरम्यान, तो मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावरील दरी पूल परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार हनुमंत मासाळ आणि चेतन गोरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला पकडले.
चौकशीत आरोपीने कात्रजमधील एका नागरिकाला धमकावून मोबाईल आणि दुचाकी चोरून नेल्याची कबुली दिली. तसेच, त्याने आंबेगाव, सिंहगड रस्ता, बावधन आणि खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत लूटमारीचे पाच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक आयुक्त राहुल आवारे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, पोलिस निरीक्षक गजानन चोरमले यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर, शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हनुमंत मासाळ, नीलेश जमदाडे, हरिश गायकवाड, सुभाष मोरे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे आदींनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तरुणांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्रात ५,५०६ पदांसाठी मेगा प्राध्यापक भरती होणार; तारीख सांगून महायुती सरकारचा मोठा निर्णय

Iran War: युद्धाचा परिणाम इंटरनेटवरही! भारतात नेट बंद होण्याची शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात?

इतिहासात लपून गेलय 'हे' ठिकाण जिथे श्रीकृष्ण अन् सुदामाची झालेली भेट; मूठभर पोहे बनले छप्पन भोग, आयुष्यात एकदातरी नक्की द्या भेट

माझ्या घटस्फोटादरम्यान बाबा एखाद्या मित्रासारखे सोबत होते... शर्मिष्ठा राऊतने वडिलांबद्दल केला भावुक खुलासा

IPL २०२६ शेड्यूल कधी जाहीर होणार? तारीख आली समोर; BCCI सचिवांनी मोठा ट्विस्टही सांगितला!

SCROLL FOR NEXT