पुणे

सुनिधी चौहान यांच्या मैफिलीची उत्सुकता शिगेला सकाळ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ ः शनिवारी रंगणार कार्यक्रम

CD

पुणे, ता. २ ः हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या गायिका सुनिधी चौहान यांच्या पुण्यातील मैफिलीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. शनिवारी (ता. ६) सायंकाळी ७ वाजता कोथरूडच्या सूर्यकांत काकडे फार्म येथे होणाऱ्या या भव्य मैफिलीची मोजकीच तिकिटे शिल्लक आहेत.
‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ अंतर्गत ‘सुनिधी चौहान - आय ॲम होम’ या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफिलीसाठी ‘सुहाना मसाले’ हे मुख्य प्रायोजक असून, विश्वकर्मा विद्यापीठ आणि भारती विद्यापीठ हे सहप्रायोजक आहेत. तसेच, व्हीटीपी रिअल्टी, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट्स आणि सूर्यकांत काकडे व असोसिएट्स हे सहयोगी प्रायोजक आहेत.
सुनिधी चौहान या दीर्घ कालावधीनंतर पुण्यात सादरीकरणासाठी येत आहेत. त्यामुळे रसिकांमध्ये या मैफिलीविषयी उत्सुकता आहे. त्यांना प्रत्यक्ष मैफिलीत ऐकणे, हा निराळा आणि अविस्मरणीय अनुभव असतो. ऊर्जेने भारलेले त्यांचे सादरीकरण आणि संगीतासह नृत्याचा संगम, यामुळे त्यांची मैफील कानांसह डोळ्यांचेही पारणे फेडणारी असते. त्यामुळे हा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी आणि ‘इश्क सुफियाना’, ‘कमली’, ‘धूम मचाले’ अशी एकापेक्षा एक बहारदार गाणी ऐकण्यासाठी पुणेकर उत्सुक आहेत.

या मैफिलीची तिकीटे districtbyzomato.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच, बातमीसोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून देखील तिकिटे आरक्षित करता येणार आहेत. रसिकांनी लवकरात लवकर तिकिटे आरक्षित करावीत, असे आवाहन सकाळ माध्यम समूहाने केले आहे.
----
मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन
सुनिधी चौहान यांच्या मैफिलीचे कार्यक्रमस्थळ हे वनाज मेट्रो स्थानकापासून सुमारे ८०० मीटरपेक्षा कमी अंतरावर आहे. त्यामुळे नागरिकांना तेथे चालत पोहोचणे सहज शक्य आहे. त्यासाठी ‘महामेट्रो’ने वनाज-रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड मेट्रोमार्गावरून विशेष व्यवस्था केली असून गरजेनुसार दर सात मिनिटांनी मेट्रोची वाहतूक होणार आहे. तसेच, नागरिकांची गर्दी लक्षात घेता रात्री अकरानंतरही मेट्रोच्या दोन जादा फेऱ्यांचे नियोजन ‘महामेट्रो’ने केले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला येणाऱ्या रसिकांनी मेट्रोचा वापर करावा, असे आवाहन ‘सकाळ’ आणि ‘महामेट्रो’ने केले आहे.
फोटोः 72948, 72956, 72961

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike: गॅस सिलिंडर दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले; मध्यमवर्गीय व कामगार कुटुंबांवर आर्थिक ताण

कीर्ती आझाद काय म्हणाले, यावर मी आता काय बोलू? इशान किशनचा Video Viral; माजी खेळाडूनं केलंय वादग्रस्त विधान....

माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे पण... अनेक वर्षांपासून सख्ख्या बहिणीसोबत बोलत नाही नेहा पेंडसे; कारण सांगत म्हणाली- 'आमच्यात...'

Latest Marathi News Live Update : मुंबईच्या ओशिवरा परिसरात झोपडपट्टीला मोठी आग

chhatrapati sambhajinagar rada: भाजप पदाधिकारी अन् अंबादास दानवेंमध्ये तुफान राडा

SCROLL FOR NEXT