पुणे, ता. २ : नवीन शैक्षणिक धोरणे आली असली तरी ती बहुतांश कागदोपत्रीच राहिली आहेत. यात खरा बदल घडवायचा असेल तर शिक्षणपद्धती प्रयोगशील असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोग करण्यास संधी दिली पाहिजे, असे मत अॅड. अभय आपटे यांनी व्यक्त केले.
विद्या महामंडळ संस्थेच्या ६४ व्या वर्धापनदिनी व लोकशिक्षण दिनानिमित्त पु. ग. वैद्य स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच पार पडला. यावेळी आपटे प्रशालेचे माजी विद्यार्थी बांधकाम व्यावसायिक तुषार केवटे यांना अॅड. आपटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राम रानडे, कार्याध्यक्ष अमोल साने, कार्यवाह लीलाधर गाजरे आदी उपस्थित होते. अकरा हजार रुपये, धनादेश, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. सुमेधा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. लीलाधर गाजरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौतम मगरे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.