पुणे, ता. २ ः महापालिकेच्या वाहनतळासंबंधी सर्वाधिक तक्रारी असणाऱ्या वाहनतळाच्या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रकार महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली असून, त्यासंबंधी चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले.
महापालिकेच्या वाहनतळांवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात जादा शुल्क घेण्याबरोबरच दमदाटी, शिवीगाळ, मारहाणीसारखे प्रकार सुरू आहेत. या प्रकाराची दखल घेत ‘सकाळ’ने ‘आर्थिक लुटीचा तळ’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश विशेष प्रकल्प विभागाला दिले होते. मात्र, तरीही कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात होती. वाहनतळाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांकडूनच ठेकेदारांवर कारवाई होऊ नये, यासाठी खोटी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता.
मंडईतील कै. सतीशशेठ धोंडीबा मिसाळ वाहनतळासंबंधी नागरिकांच्या सर्वाधिक तक्रारी असतानाही संबंधित ठेकेदारावर मात्र कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. अधिकाऱ्यांकडून सुरू असणारा हा प्रकार आयुक्तांसमोर ‘सकाळ’ने मांडला. हा प्रकार गंभीर असून, या प्रकाराची गांभीर्याने चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.