पुणे

सोसायट्यांची कामे गतीने मार्गी लागणार

CD

पुणे, ता. ३ : सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतर (डीम्ड कन्व्हेयन्स) दस्ताची (खरेदीखत) लवकर नोंदणी व्हावी. तसेच त्यामध्ये एकसूत्रीपणा असण्यासाठी पुण्यातील २७ पैकी दोन सह दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बुधवारी केली.
मानीव अभिहस्तांतर जिल्हास्तरीय समन्वय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी ही सूचना दिली. याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे संजय राऊत, पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त पंकज पाटील, पुणे शहराचे प्रशासकीय अधिकारी मंगेश खामकर, पुणे ग्रामीणचे प्रशासकीय अधिकारी अनिल जगताप, राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट्स महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, पुणे गृहनिर्माण सोसायटी फेडरेशनचे ॲड. वसंत कर्जतकर आदी उपस्थित होते.
डुडी म्हणाले, ‘‘नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी झाल्यानंतर चार महिने कालावधी पूर्ण होताच अभिहस्तांतर पूर्ण करण्यात येणे गरजेचे आहे. मात्र त्याची ठोस कार्यवाही होताना दिसून येत नाही. त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अभिहस्तांतर पूर्ण करण्यासाठी सर्वसमावेशकपणे कार्यवाही करावी. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अभिहस्तांतर पूर्ण करण्यासाठी कायद्यानुसार गतीने कार्यवाही करून प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावेत, विकासकानेही स्वतःहून पुढे येऊन मानीव अभिहस्तांतर प्रक्रिया पूर्ण करावी.’’
राऊत म्हणाले, ‘‘मानीव अभिहस्तांतराबाबत अडचणी आल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय तसेच पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ कार्यालयाशी संपर्क साधावा.’’
पटवर्धन म्हणाले, ‘‘सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतराबाबत महासंघाच्या वतीने प्रशासनाला सहकार्य करण्यात येत आहे. समितीच्या वतीने नोंदणी व मुद्रांक विभागाकडे पाठपुरावा करून याप्रकरणी एक खिडकी योजना सुरू करावी.’’


पुण्यातील स्थिती...

२२ हजार ९५५
- नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था

६ हजार ५५३
- मानीव अभिहस्तांतर प्राप्त प्रस्ताव

६ हजार २२४
- अभिहस्तांतर झालेल्या संस्था

३ हजार ५७
- विकसकाने अभिहस्तांतर केलेल्या संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT