पुणे

बेवारस रुग्‍णांचा प्रश्‍न गंभीर

CD

पुणे, ता. ५ : शहरातील बेवारस रुग्‍णांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अनेकदा नातेवाईक रुग्णांना ससून रुग्‍णालयात उपचारासाठी दाखल करतात व पुन्‍हा त्‍यांना घेऊन जात नाहीत. वर्षाकाठी असे ४५० ते ५०० बेवारस रुग्‍ण ससूनमध्ये दाखल होतात. उपचार झाल्‍यानंतर त्‍यांचे पुनर्वसन करण्‍याची जबाबदारी रुग्‍णालयातील समाजसेवा वैद्यकीय विभागाकडे असते. मात्र, अनेक संस्‍था बेवारस रुग्‍णांना घेत नसल्‍याने त्‍यांच्‍या पुनर्वसनाचा प्रश्‍न गंभीर होतो. त्‍यासाठी बेवारस रुग्‍णांना नातेवाइकांनी घेऊन जावे, असे आवाहन रुग्‍णालयाने केले आहे.
रस्‍त्‍यावर पडलेल्‍या व्‍यक्‍तींना विविध संस्‍था, सामाजिक कार्यकर्ते ससूनमध्‍ये दाखल करतात. यामध्‍ये यात अनेकदा भिक्षेकरी असतात. त्‍यांना जेव्‍हा अपघात किंवा इतर कारणांमुळे उपचारासाठी दाखल केले जाते, तेव्‍हा त्‍यांच्‍याकडे ओळखपत्रही नसते. ससूनमध्ये त्‍यांच्‍यावर उपचार होतात; मात्र अनेकदा ते चालू-फिरू शकत नसल्‍याने त्‍यांचे सर्व विधी रुग्‍णालयातील कर्मचाऱ्यांनाच करावे लागतात. त्‍याचा भार ससून रुग्‍णालयातील परिचारिका, स्‍वच्‍छता कर्मचारी यांच्‍यावर येतो. जेव्‍हा ते बरे होतात, तेव्हा त्‍यांचे पुनर्वसन करणे आवश्यक ठरते. अनेक संस्‍थाही अशा बेवारसांना घ्यायला पुढे येत नाहीत, अशी माहिती रुग्‍णालयातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांना दिली. ससूनमध्ये वर्षाकाठी ८५० ते ९०० रुग्‍ण आपत्कालीन कक्षात बेवारस म्‍हणून दाखल होतात. त्‍यापैकी निम्‍म्‍यांची ओळख पटते किंवा त्‍यांचे नातेवाईक त्‍यांना घ्यायला येतात. मात्र, ज्‍यांची ओळख पटत नाही, त्‍यांचे काय करायचे, हा मोठा प्रश्‍न निर्माण होतो.

बेवारस रुग्णांच्या उपचाराबाबत..
१) बेवारस व प्रकृती स्थिर झालेल्या रुग्णांना वैद्यकीय समाजसेवा विभाग शासनमान्य किंवा नोंदणीकृत संस्थांकडे पुनर्वसनासाठी पाठवतो.
२) त्‍यांची प्रकृती गंभीर किंवा अत्यवस्थ असल्यास त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी संबंधित विषयाच्‍या तज्ज्ञांकडे तपासणी व उपचारासाठी सूचित केले जाते.
३) अनोळखी रुग्णांची भरती होताच संबंधित विभागाच्या साहाय्यक प्राध्यापक आणि पथक प्रमुखांना सूचना देणे बंधनकारक असते.
४) समाजसेवा अधीक्षक आणि त्यांचे कर्मचारी रुग्णाला योग्य कक्षात भरती करतात.
५) अशा रुग्णांच्या देखभालीसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. ते त्‍यांच्‍या रोजच्या उपचारांवर लक्ष ठेवत असतात. त्‍यांच्‍या नातेवाइकांचा शोधही समाजसेवा विभाग घेतो.
६) रुग्णांची ओळख पटवून कुटुंबीयांपर्यंत पोहोचवणे किंवा योग्य संस्थेमार्फत त्यांचे पुनर्वसन पूर्ण करणे, हा या प्रक्रियेचा अंतिम टप्पा असतो.

बेवारस रुग्णांची इतर शासकीय रुग्णालयांमध्ये सोय झाल्यास ससून रुग्णालयावरील निम्‍मा ताण कमी होईल. त्यामुळे येथील बेवारस रुग्णांची सेवा योग्य प्रकारे करता येई.
- डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

अनोळखी रुग्ण आपत्कालीन विभागात दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम कार्यरत वैद्यकीय अधिकारी त्यांची प्राथमिक तपासणी करतात. त्‍यानंतर त्‍यांना अस्थिव्‍यंगोपचार विभाग, वैद्यकशास्‍त्र, सामान्‍य शस्त्रक्रिया विभाग, जळीत विभाग, कान-नाक-घसा अशा विविध विभागांमध्ये वर्षभरात ४५० अनोळखी आणि बेवारस रुग्णांनी उपचार घेतले आहेत. अनेकदा बेवारस रुग्ण अंथरुणाला खिळलेले असतात. त्‍यांची ‘मेडिको लीगल केस’ अशी नोंद करण्यात येते आणि संबंधित माहिती तत्काळ पोलिसांना कळवली जाते.
- डॉ. यल्लपा जाधव, वैद्यकीय अधीक्षक

तुमचे मत मांडा...
ससून रुग्णालयामध्ये वर्षाकाठी ४५० ते ५०० बेवारस रुग्‍ण दाखल होतात. उपचारानंतर नातेवाईक त्यांना घेऊन जात नाहीत. त्यामुळे त्‍यांच्‍या पुनर्वसनाचा प्रश्‍न गंभीर होत आहे. याबाबत तुमचे मत मांडा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Breaking News LIVE: मालवणी पोलिसांकडून नायजेरियन नागरिकाला ७२ लाखांच्या कोकेनसह अटक

Gold Price: महत्त्वाची बातमी! सोन्याच्या किमती १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार, आश्चर्यकारक अहवाल समोर

Pune News : आचारसंहितेच्या धास्तीने निविदा मंजुरीसाठी धडपड; ४०० कोटीच्या कामाचे प्रस्ताव मंजूर

Pune News : कमला नेहरू रुग्णालयात २५ तज्ज्ञ डॉक्टरांची भरती; पगारात केली दुप्पटीने वाढ

Snake Bite : संर्पदंश झालेल्या शेतकऱ्याचे वाचणार प्राण; ‘स्नेक व्हेनम रॅपिड टेस्ट कीट’ ठरणार जीवरक्षक

SCROLL FOR NEXT