पुणे

पुणे-नाशिक लोहमार्गाचा ‘नवा प्रवास’

CD

पुणे, ता. ३ ः ‘जीएमआरटी’ला (जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीण) बाधा निर्माण होत असल्याने रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित पुणे-नाशिक हायस्पीडचा लोहमार्ग रद्द केला. ‘जीएमआरटी’पासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावरून आता नवीन लोहमार्ग होणार आहे. पुणे ते नाशिक लोहमार्ग हा दोन टप्प्यात होत आहे. यात पुणे ते अहिल्यानगर हा सुमारे १३३ किलोमीटरचा लांबीच्या मार्गासाठी सुमारे ८ हजार ९७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याचा प्रस्ताव सध्या रेल्वे बोर्डाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. हा मार्ग सध्याच्या रस्ते महामार्गाला समांतर असणार असून चाकणमार्गे नवीन दुहेरी मार्गिका असणार आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी संसदेत या विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वरील माहिती दिली. या मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल असे त्यांनी सांगितले. कोकण रेल्वेकडून पुणे-नाशिकसाठी दुसऱ्या मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल काही महिन्यापूर्वीच रेल्वे बोर्डाला सादर झाला. त्यानुसार हा मार्ग पुणे-चाकण-अहिल्यानगर-निंबळक-पुणतांबा -शिर्डी-नाशिक असा असेल. पुणे-अहिल्यानगर हा रेल्वे मार्ग सध्याच्या महामार्गाला समांतर असणार आहे. तर शिर्डी ते नाशिक यासाठी नवीन मार्ग निश्चित केला आहे. अहिल्यानगरहून नाशिकसाठी नवीन मार्ग असणार आहे. यात अहिल्यानगर-निंबळक-पुणतांबा-शिर्डी-नाशिक या स्थानकाचा समावेश असणार आहे.

महत्त्वाचे
- ‘महारेल’च्या प्रस्तावात हायस्पीडचा रेल्वेचा समावेश होता. आता हा प्रकल्प सेमी हायस्पीडचा असणार आहे
- हा प्रकल्प मध्य रेल्वेचा बांधणी विभाग करणार आहे
- हा रेल्वे मार्ग ‘ब्रॉडगेज’ असेल त्यावरून ताशी १६० ते १८० किमी वेगाने रेल्वे धावू शकेल
- नव्या लोहमार्गामुळे पुणे-नाशिक दरम्यान काही प्रमाणात अंतर व वेळ वाढेल
- पुणे ते नाशिक असा थेट लोहमार्ग होत आहे. सेमी हायस्पीड प्रकल्प असल्याने रेल्वे गाड्या वेगात धावतील

असा आहे प्रकल्प
- पुणे ते अहिल्यानगर (१३३ किमी) : ८ हजार ९७० कोटी रुपयांचा खर्च
- अहिल्यानगर ते निंबळक (६ किमी) : दुहेरीकरणाचे काम प्रगतिपथावर
- निंबळक ते पुणतांबा (८० किमी) : दुहेरीकरण पूर्ण
- पुणतांबा - शिर्डी (१७ किमी) ः २४० कोटी मंजूर
- शिर्डी - नाशिक : डीपीआर सादर मजुरीच्या प्रतीक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: दोन दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजारात जोरदार उसळी! कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर्स? पाहा आजचे IPO अपडेट

राज्यात अवयव प्रत्यारोपण झाले दुप्पट; राज्य सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी

Latest Marathi News Live Update : स्वीकृत नगरसेवक पदासाठी एक वर्षाचा फॉर्म्युला; भाजप-शिंदे सेनेत मोठी स्पर्धा

Court News: जिजूने छेड काढली म्हणून गोंधळ; कोर्टात मेहुणीची धक्कादायक कबुली... “ते फक्त स्वप्न होतं!” ७ वर्षांनी एअरफोर्स जवान निर्दोष

भाईजानचं चाहत्यांना गिफ्ट! नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा, सलमान साऊथच्या दोन अभिनेत्रीसोबत दिसणार

SCROLL FOR NEXT