पुणे, ता. ५ : ‘इश्क सुफियाना’, ‘कमली’, ‘धूम मचाले’, ‘है शोना’, ''देसी गर्ल'' अशा एकापेक्षा एक बहारदार गाण्यांची पर्वणी रसिकांना शनिवारी (ता. ६) मिळणार आहे. निमित्त आहे, प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांच्या पुण्यातील मैफिलीचे. हिंदी चित्रपटसृष्टीतील या आघाडीच्या गायिकेच्या पुण्यातील मैफिलीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ अंतर्गत शनिवारी सायंकाळी सात वाजता कोथरूडच्या सूर्यकांत काकडे फार्म येथे ‘सुनिधी चौहान- आय ॲम होम’ या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून कार्यक्रमस्थळी रसिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सुसज्ज व्यवस्था केली आहे.
या कार्यक्रमासाठी ‘महामेट्रो’ने विशेष नियोजन केले असून प्रत्येक मार्गावर प्रत्येकी पाच मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पार्किंग, कार्यक्रमाला न्यायला परवानगी असलेल्या वस्तू, येण्याचा मार्ग आदींबाबत नियमावली आणि मार्गदर्शक सूचना तयार केल्या असून रसिकांनी याचे पालन करावे, असे आवाहन ‘सकाळ माध्यम समूहा’ने केले आहे.
१) हे लक्षात ठेवा :
- प्रवेश करताना फोनवर क्यूआर कोड तयार ठेवा
- सरकारमान्य ओळखपत्र घेऊन येणे आवश्यक
- पुन्हा प्रवेश (री-एंट्री) दिला जाणार नाही
- धूम्रपान व मद्यपान करण्यास सक्त मनाई
- डेबिट कार्ड अथवा रोख रक्कम सोबत ठेवा
- कार्यक्रमस्थळी नेण्यास मनाई असलेल्या वस्तू आणू नका
२) कार्यक्रमाचे वेळापत्रक :
- कार्यक्रमस्थळी तिकीटविक्री केंद्र (बॉक्स ऑफिस) सुरू होण्याची वेळ : सकाळी ११ वाजता
- कार्यक्रमाला प्रवेश सुरू : सायंकाळी पाचपासून
- कार्यक्रम सुरू होण्याची वेळ : सायंकाळी सात वाजता
- तिकीटविक्री केंद्र बंद होण्याची वेळ : रात्री आठ वाजता
३) स्थळ व पार्किंगची माहिती :
- कार्यक्रम स्थळ : सूर्यकांत काकडे फार्म, कोथरूड
- जवळचा बस थांबा : साम्राज्य (म्हातोबा)
- जवळचे मेट्रो स्टेशन : वनाज मेट्रो स्टेशन
पार्किंगची सुविधा :
- मोफत मात्र मर्यादित पार्किंग सुविधा उपलब्ध
- प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, या तत्त्वावर पार्किंगसाठी प्रवेश
- वॅलेट सेवा उपलब्ध नाही
४) खाद्यपदार्थ व पेय यासाठीचे नियम :
- खाद्यपदार्थ व पेय कार्यक्रमस्थळी विक्रीसाठी उपलब्ध
- बाहेरील खाद्यपदार्थ व पेय आणण्यास मनाई
५) कार्यक्रमस्थळी मनाई असलेल्या वस्तू :
- बाहेरील खाद्यपदार्थ व पेय
- सिगारेट/लायटर
- ज्वलनशील वस्तू
- धारदार किंवा धोकादायक वस्तू
- नाणी
- प्रोफेशनल कॅमेरे
- सेल्फी स्टीक
- लॅपटॉप
- हेल्मेट
- ड्रोन
- पॉवरबँक
- ई-सिगारेट
- अॅरोसोल परफ्युम
- कॅन
- कोणतेही प्राणी
- स्केटबोर्ड
- खुर्ची
- पाण्याची बाटली
- साउंड सिस्टम
- ए-फोर आकारापेक्षा मोठ्या बॅग
- छत्री
- मद्य
- लेझर लाइट/बॅनर्स
- आवश्यकतेनुसार सिक्युरिटी टीम अतिरिक्त वस्तूंनाही मनाई करू शकते.
६) बॅगसाठीचे नियम :
परवानगी असलेल्या बॅग्ज :
- वॉलेट
- ६” x ९” आकाराची छोटी बॅग (तपासणी केल्यानंतर परवानगी)
परवानगी नसलेल्या बॅग्ज :
- बॅकपॅक
- टोट बॅग
- साइड बॅग
- ए-फोर आकारापेक्षा मोठ्या बॅग्ज (३० सेंटिमीटर x १८ सेंटिमीटर)
- डफल बॅग
- ट्रॉली बॅग
- प्रवासी बॅग (१२” x ६” x १२” आकारापेक्षा मोठ्या)
- लॉकर सुविधा उपलब्ध नाही
- आणलेल्या वस्तूंची जबाबदारी त्या-त्या व्यक्तीची
७) नकाशामध्ये खालील गोष्टी पाहा :
- मुख्य प्रवेशद्वार
- चारचाकी पार्किंग प्रवेश
- दुचाकी पार्किंग प्रवेश
- बस थांबा
- वनाज मेट्रो स्टेशन
८) मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन :
सुनिधी चौहान यांच्या मैफिलीचे ठिकाण असलेले सूर्यकांत काकडे फार्म हे वनाज मेट्रो स्टेशनपासून अवघ्या ८०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे केवळ १० ते १२ मिनिटांमध्ये मेट्रो स्टेशनपासून चालत कार्यक्रमस्थळी पोहोचणे शक्य आहे. तसेच, खास या कार्यक्रमासाठी मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याचे नियोजन ‘महामेट्रो’ने केले असून दर पाच मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. या दिवशी सर्व मार्गांवरील मेट्रोच्या फेऱ्यांची वेळ रात्री ११.३० पर्यंत वाढविली आहे. तसेच सर्व मेट्रो स्थानकांवर गर्दीचे व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुसज्ज यंत्रणा कार्यरत असेल. त्यामुळे सुनिधी चौहान यांच्या मैफिलीला येणाऱ्या अधिकाधिक रसिकांनी मेट्रोचा वापर करावा, असे आवाहन ‘सकाळ’ आणि ‘महामेट्रो’ने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.