पुणे

कल्याणीनगर अपघात- आरोपींची नावे - गुन्ह्यातील भूमिका - आत्ता ते कुठे आहेत

CD

१ : अल्पवयीन मुलगा : बेदरकारपणे वाहन चालवत धडक दिल्याने दोघांचा मृत्यू : न्यायालयाकडून जामीन मंजूर
२ : अल्पवयीन मुलाचे वडील विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल : अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यास परवानगी दिली, चालकाच्या अपहरणाचा प्रयत्न व रक्ताचे नमुने बदलले : येरवडा कारागृहात रवानगी, उच्च न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला.
३ : आई शिवानी विशाल अग्रवाल : तपासणीसाठी मुलाऐवजी स्वतःचे रक्त दिले : सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन
४ : आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल : गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी चालकावर दबाव आणत अपहरणाचा प्रयत्न : जामीन मंजूर
५ : कोझी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा : अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरवले : जामीन मंजूर
६ : कोझीचे व्यवस्थापक सचिन अशोक काटकर : अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरवले : जामीन मंजूर
७ : ब्लॅक पबचे मालक संदीप रमेश सांगळे : अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरवले : जामीन मंजूर
८ : कर्मचारी नीतेश धनेश शेवानी : अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरवले : जामीन मंजूर
९ : ब्लॅकच्या बार काउंटरचा व्यवस्थापक जयेश सतीश गावकर : अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरवले : जामीन मंजूर
१० : ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे : रक्ताचे नमुने बदलण्याची सूचना केली : येरवडा कारागृहात रवानगी
११ : आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर : रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केला : येरवडा कारागृहात रवानगी
१२ : शिपाई अतुल घटकांबळे : रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्यात सहभाग : येरवडा कारागृहात रवानगी
१३ : अश्पाक बाशा मकानदार : रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार केला : येरवडा कारागृहात रवानगी
१४ : अमर संतोष गायकवाड : रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार केला : येरवडा कारागृहात रवानगी

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील घटनाक्रम
१९ मे : अपघात घडला व दोघांचा मृत्यू
२० मे : मद्यपान करून दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या मुलाला बाल न्याय मंडळाकडून जामीन
२१ मे : विशाल अगरवाल, नमन भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे, नीतेश शेवानी आणि जयेश गावकर यांना अटक
२२ मे : अल्पवयीन आरोपीची पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी
२४ मे : मुलाचे वडील असलेल्या बांधकाम व्यावसायिकासह पब चालक व कर्मचाऱ्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
२४ मे : तपासात दिरंगाई केल्याबद्दल येरवडा ठाण्यातील पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी निलंबित
२५ मे : तपास गुन्हे शाखेकडे वर्ग
२५ मे : बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र अग्रवाल यांच्या बंगल्यावर पोलिसांचा छापा
२५ मे : चालकाला धमकावल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक
२६ मे : चालकाला धमकावल्याप्रकरणी विशाल अग्रवाल यांना अटक
२७ मे : विशाल अग्रवाल, कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज
२७ मे : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि अतुल घटकांबळे यांना अटक
२८ मे : चालकाला धमकावले म्हणून विशाल व सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी
३० मे : रक्ताचे नमुने हे सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या ठिकाणी घेतले असल्याची पोलिसांची न्यायालयात माहिती
१ जून : विशाल अग्रवालसह पब मालकांच्या जामिनाबाबत पोलिसांचे म्हणणे सादर
१ जून : रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल व शिवानी विशाल अग्रवाल यांनी अटक
२ जून : शिवानी आणि विशाल अग्रवाल यांना पाच जूनपर्यंत पोलिस कोठडी
२ जून : डॉ. तावरेसह इतरांच्या कोठडीत पाच जूनपर्यंत वाढ
४ जून : रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी
अश्पाक बाशा मकानदार आणि अमर संतोष गायकवाड यांना अटक
५ जून : मुलाऐवजी आईचेच रक्त घेतल्याचे डीएनए अहवालात स्पष्ट
५ जून : बांधकाम व्यावसायिक, कोझीचे मालक व ब्लॅक पबच्या कर्मचाऱ्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी
५ जून : अग्रवाल पती-पत्नीला १० तर डॉक्टरांना सात जूनपर्यंत पोलिस कोठडी
५ जून : मुलाचा बालसुधारगृहात मुक्काम १२ जूनपर्यंत वाढविला
१२ जून : अल्पवयीन मुलाबरोबर पार्टीत सामील झालेल्या १५ जणांची चौकशी
१२ जून : मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम २५ जूनपर्यंत वाढला
१५ जून : मुलाला जामीन मंजूर करताना जेजेबीच्या मंडळाकडून पुष्कळ चुका राहिल्याचा चौकशी समितीचा अहवाल सादर
२५ जून : अल्पवयीन मुलास उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
१ ऑगस्ट : अग्रवाल दांपत्य, डॉ. तावरे, डॉ. हाळनोर, मकानदार, घटकांबळेंविरोधात ९०० पानी दोषारोपपत्र दाखल
१५ नोव्हेंबर : सूद, मित्तलविरोधात २४२ पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल
१० जानेवारी : सिंगविरोधात ४७७ पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल
२३ एप्रिल २०२५ : शिवानी अग्रवाल हिस सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन

तपासातून पुढे आलेल्या बाबी....
१) मुलाने मोटार चालवायला मागितली तर त्याला मोटार चालवायला दे, अशी सूचना विशाल अग्रवाल यांनी त्यांच्या चालकाला दिली होती
२) ब्लॅक पबमधील कामगारांनी अल्पवयीन मुलांना टेबलवर मद्य पुरवले
३) मद्याचे ४८ हजार रुपयांचे बिल अल्पवयीन मुलाने भरले. पार्टीसाठी आलेल्या प्रत्येकाने दिले होते अडीच हजार रुपये
४) अपघातग्रस्त मोटारीची नोंदणी झालेली नव्हती
५) ग्राहक न्यायालयात पोर्शे मोटारीचा दावा सुरू
६) विशाल अग्रवाल यांनी अपघातानंतर मोबाईल लपवला
७) पोलिस तपासात अग्रवाल यांनी चुकीची माहिती दिली
८) मुलाचे वडील आणि आजोबांनी त्यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केली
९) गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी चालकावर दबाव आणत त्याचे अपहरण करून त्याला अन्यायाने ताब्यात ठेवले
१०) मुलासोबत असलेल्या चालकाचा मोबाईल सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी धमकावून काढून घेतला
११) डॉ. तावरे आणि मकानदारचे पाच महिन्यांत सुमारे ७० फोन
१२) मकानदार आणि डॉ. तावरे यांनी दिला रक्त बदलण्याचा सल्ला
१३) मुलाच्या आई-वडिलांनीच रचला रक्ताचे नमुने बदलण्याचा कट
१४) श्रीहरी हाळनोर यांनी शिवानी यांचे रक्त घेतले
१५) मकानदार अवैध धंद्यांशी निगडित असून हुक्का पार्लरही चालवत आहे

गुन्हा दाखल झालेली कलमे आणि शिक्षा
भारतीय दंड विधान कलम - गुन्हा - शिक्षा काय आहे?
२७९ : बेदरकारपणे किंवा निष्काळजीपणे कोणत्याही सार्वजनिक मार्गावर वाहन चालवणे - सहा महिन्यांपर्यंत कारावास व दंड किंवा दोन्ही
३०४ : मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेला गुन्हा- जन्मठेप किंवा १० वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही
३०४ अ : निष्काळजीपणामुळे किंवा अविचारी कृत्याने मृत्यूला कारणीभूत ठरणे- दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा
३३७ : अविचारीपणा किंवा निष्काळजीपणा करून कोणत्याही व्यक्तीला दुखावणे- सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा
३३८ : अविचारीपणे किंवा निष्काळजीपणा करून एखाद्या व्यक्तीला गंभीर दुखापत करणे- दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही
४२७ : सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे- दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही

मोटार वाहन कायद्यानुसार दाखल कलमे
१८४ : धोकादायकपणे वाहन चालवणे- पाच हजार रुपयापर्यंत दंड आणि एका वर्षापर्यंत कारावास
११९ : वाहतूक चिन्हाचे पालन न करणे- दंडाची शिक्षा
१७७ : वाहतूक नियमांचे, विनिमयाचे किंवा अधिसूचनेचे उल्लंघन करणे- पहिल्या गुन्ह्यास ५०० रुपयांपर्यंत दंड असू शकतो, दुसरा किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यास दीड हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो

ससूनच्या डॉक्टरांना काय शिक्षा होणार?
रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी अग्रवाल पती-पती, ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर आरोपींवर देखील याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात ३०४, ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, ४२७ यांसह पुढील कलमानुंसार कारवाई करण्यात आली आहे. हा गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना पुढील कलमांनुसार शिक्षा होवू शकते.

भारतीय दंड विधान कलम - गुन्हा - शिक्षा काय आहे?
१२० (ब) : अन्यायाने संगनमत किंवा फौजदारी पात्र कट- मुळ गुन्ह्याइतकीच शिक्षा
२०१ : आरोपीचा बचाव करण्यासाठी पुरावा नष्ट करणे- ३ ते १० वर्षे कैद आणि दंड
२१३ : कायदेशीर कारवाई न करण्याच्या बदल्यात लाच स्वीकारणे- तीन ते सात वर्षे कैद किंवा दंड
२१४ : उद्देशपूर्वक खोटा पुरावा देणे किंवा खोटा पुरावा रचणे- तीन ते सात वर्षे कैद किंवा दंड
४६६ : लोकसेवकाने ठेवलेल्या न्यायालयाच्या किंवा जन्म निबंधकाच्या खोट्या नोंदी करणे- सात वर्ष व दंड
४६७ : कोणतीही मौल्यवान सुरक्षा हस्तांतर करणे किंवा कोणतेही पैसे प्राप्त करणे- जन्मठेप किंवा १० वर्षे कैद व दंड
४६८ : मर्यादेचा कालावधी संपल्यानंतर दखल घेण्यास प्रतिबंध - सहा महिने ते तीन वर्षे कारावास व दंड
४७१ : बनावट दस्तऐवज खरा म्हणून त्याचा वापर करणे- सात वर्षे तुरुंगवास व दंड भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ कलम
७ : लोकसेवकाला लाच दिल्याबद्दलचा गुन्हा- तीन ते सात वर्षे कारावास


बडतर्फ सदस्यांकडून याचिका
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याच्या, तसेच वाहतूक पोलिसांबरोबर नियमन करण्याच्या अटींवर जामीन दिल्याप्रकरणी राज्य सरकारने बडतर्फ केलेल्या पुणे बाल न्याय मंडळातील दोन सदस्यांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने याचिका दाखल करून शासनाला नोटीस बजावली आहे. बडतर्फ सदस्य डॉ. लक्ष्मण नेमा दानवडे आणि कविता तुळशीराम थोरात यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायमूर्ती ए. एस. चांदुरकर आणि न्यायमूर्ती एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठाने राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाला नोटीस बजावली आहे. याप्रकरणी १८ जूनला पुढील सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma ODI retirement: 'काय निवृत्ती घेऊ? प्रत्येकवेळी जिंकलो म्हणून...' रिषभ पंतला रोहितचा सवाल

Thane News: डोंबिवलीत जुनी इमारत पाडकामात महापालिकेच्या स्कायवॉकचे नुकसान, प्रवाशांसाठी मार्ग बंद

Latest Marathi News Live Updates : पिकअप अपघातातील बाराव्या महिलेचा मृत्यू

Dhananjay Munde: 'सातपुडा' बंगल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस; मुंडेंना धक्का

Instagram Friends Map : इंस्टाग्राममध्ये आलं मॅप फीचर; मुलींच्या सुरक्षेसाठी खूपच फायद्याचं, कसं वापरायचं लगेच पाहा

SCROLL FOR NEXT