पुणे

महात्मा गांधी विद्यालयात गरजूंना आर्थिक साह्य

CD

खडकवासला, ता. ८ ः खानापूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून गरजवंत व हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक साह्य करीत शैक्षणिक साहित्य वाटप केले.

माजी विद्यार्थी रघुनाथ यादव, नंदकुमार कारळे, पांडुरंग कारळे, विजय कारळे व बाबासाहेब शिंदे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.

याप्रसंगी रघुनाथ यादव म्हणाले की, देशाचे शिस्तप्रिय व सुजाण नागरिक घडविण्यात शाळेचे मोलाचे योगदान आहे. आम्ही या शाळेचे विद्यार्थी आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत जाधव यांनी शैक्षणिक साहित्य व शैक्षणिक शुल्क धनादेश उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले.

प्रास्ताविक प्राचार्य शिवराम साबळे यांनी केले. सर्व माजी विद्यार्थी हे नेहमीच शाळेच्या गौरवात भर घालतात असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान मदने यांनी केले. उपस्थितांचे आभार नूतन ओतुरकर यांनी मानले. फलकलेखन अपर्णा आढाव यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन नूतन ओतुरकर यांच्यासह शीतल वरपे, तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर सहकाऱ्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT