पुणे

पुण्यात डेंगीच्या रुग्णसंख्येत घट

CD

पुणे, ता. ९ : पावसाळा संपल्‍याने शहरातील डेंगीची स्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. महापालिकेच्‍या आरोग्य खात्‍याकडील कीटक प्रतिबंधात्‍मक विभागाच्‍या आकडेवारीनुसार डेंगीच्‍या संशयित व निश्चित निदान झालेल्‍या रुग्णांमध्‍ये गेल्या दोन महिन्यांत घट झाली आहे. सर्वेक्षण, धूर फवारणी आणि जनजागृतीमुळे ही संख्‍या कमी झाल्याचे महापालिकेच्‍या आरोग्‍य विभागाने सांगितले. कीटक प्रतिबंधक विभागाच्‍या अहवालानुसार, शहरात वर्षभरात एकूण दोन हजार ५७६ संशयित डेंगी रुग्‍णांची संख्‍या नोंदवली गेली असून त्यापैकी १०९ रुग्णांचा डेंगीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर एकही मृत्यू झालेला नाही. यामध्‍ये जुलै, ऑगस्‍ट व सप्‍टेंबर अशी अनुक्रमे ११, २८, ३५ रुग्‍णसंख्‍या वाढली होती. तर, ऑक्टोबरमध्‍ये ६ आणि नोव्हेंबरमध्‍ये १७ रुग्‍ण आढळले होते. डिसेंबर सुरू झाल्‍यापासून अद्याप रुग्‍णांची नोंद झालेली नाही.
पावसाळ्यात साचलेल्‍या पाण्‍यात डेंगीचे डास अंडी घालतात. त्‍याद्वारे डासांची उत्‍पत्‍ती होत असल्‍याने या काळात खूप जास्‍त रुग्‍ण आढळतात. त्‍याआधी व नंतर ही संख्‍या कमी असते. गेल्‍या आठवड्यापासून रुग्णसंख्या तुलनेने कमी होत गेल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. त्‍याचबरोबर चिकुनगुनिया आणि मलेरियाची परिस्थितीही नियंत्रणात आहे. आतापर्यंत चिकुनगुनियाचे २२ रुग्‍ण नोंदविले गेले असून त्‍यांच्‍यावर उपचार पूर्ण झाले आहेत. तर मलेरियाच्या केवळ तीन रुग्‍णांची नोंद झाली आहे.

सहा लाखांचा दंड वसूल
कीटक प्रतिबंधक विभागाकडून शहरातील करण्‍यात येत असलेल्‍या तपासणीत घर, कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, बांधकामे आणि अन्य ठिकाणी २ हजार ९७८ ठिकाणी डासांची उत्‍पत्तिस्‍थळे आढळली आहेत. संबंधित जागामालकांना नोटिसा देऊन तातडीने स्वच्छतेच्या उपाययोजना करण्याचे आदेश विभागाकडून देण्यात आले. कीटकजन्‍य आजार नियंत्रण मोहिमेदरम्यान प्रशासनाने वारंवार उत्‍पत्तिस्‍थळे आढळलेल्‍या ठिकाणांवरील संबंधित जबाबदारी व्‍यक्‍ती, आस्‍थापना यांच्‍याकडून एकूण पाच लाख ९७ हजार ४०० रुपये दंड (प्रशासकीय शुल्क) म्हणून वसूल केले आहेत.

कीटक प्रतिबंधात्‍मक अंमलबजावणी आणि सातत्‍याने केलेल्‍या सर्वेक्षणामुळे डेंगी चिकुनगुनिया, मलेरिया रुग्‍णांची संख्‍या कमी झाली आहे, तसेच नागरिकांमध्‍ये विविध माध्‍यमांद्वारे जनजागृती करण्‍यात येत आहे. नागरिकांना पाणी साचू न देणे, साठवलेल्या पाण्याची स्वच्छता राखणे आणि ताप किंवा अंगदुखीची लक्षणे दिसताच त्वरित तपासणी करावी. रुग्णसंख्या घटत असली तरी सततची काळजी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. राजेश दिघे, कीटक प्रतिबंधक विभाग, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT