पुणे

इंडिगो विमानाचा ‘पार्किंग बे’वरचा मुक्काम हलविला

CD

''सकाळ''इम्पॅक्ट,
-------------
पुणे, ता. ८ ः पुणे विमानतळावर गेल्या चार दिवसांपासून अडवून ठेवलेला ‘पार्किंग बे’ सोमवारी मोकळा झाला. ‘सकाळ’मध्ये सोमवारी (ता. ८) या संदर्भात बातमी प्रसिद्ध होताच त्या ‘पार्किंग बे’पासून अखेर ते इंडिगोचे विमान दूर करण्यात आले. सोमवारी पुणे विमानतळावरील १० ‘पार्किंग बे’ आता विमानांसाठी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे विमानाची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

विमानात तांत्रिक अडचण झाल्याचे सांगत इंडिगोचे विमान चार दिवस पुणे विमानतळाच्या ‘पार्किंग बे’वरच थांबून होते. ते कधी निघेल याबाबत अधिक माहिती देण्यास विमानतळ प्रशासनाने असमर्थता दर्शवली होती. मात्र, सोमवारी ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच इंडिगोच्या विमानाचा ‘पार्किंग बे’वरचा मुक्काम हलविण्यात आला. याबाबत विमानतळ प्रशासनाने विमानातील तांत्रिक दोष दूर झाला असल्याचे सांगितले आहे. परिणामी पुणे विमानतळावरील दहा ‘पार्किंग बे’ आता सर्व विमानांसाठी उपलब्ध झाला आहे. सर्व ‘पार्किंग बे’ उपलब्ध झाल्याने विमानांची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
------------
इंडिगोचे उड्डाण वाढले
सोमवारी पुणे विमानतळावरून इंडिगोच्या ८० विमानांची वाहतूक झाली, तर ३६ विमाने रद्द झाली, तर अन्य विमान कंपन्यांच्या ५४ विमानांची वाहतूक झाली. सकाळच्या सत्रात सुमारे १० हजार प्रवाशांनी प्रवास केला. रविवारी इंडिगोच्या ५० विमानांची वाहतूक रद्द झाली होती. बुधवार (ता. १०) पर्यंत ही इंडिगोचे विमान रद्द होणार असल्याचे इंडिगोच्या वतीने जाहीर करण्यात आले.
---------------------
इंडिगोच्या विमानात झालेला तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला. सोमवारी पुणे विमानतळावरील सर्व १० ‘पार्किंग बे’ उपलब्ध झाले. त्यामुळे विमानाच्या वाहतुकीत कोणताही अडथळा येणार नाही.
संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT