पुणे

राडारोडा टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

CD

पुणे, ता. ९ ः महापालिका प्रशासन एकीकडे नदी सुधार प्रकल्प राबवीत असताना, दुसरीकडे मुळा-मुठा नदीपात्रात राडारोडा टाकण्याचा गंभीर प्रकार सुरू आहे. त्याची महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी गांभीर्याने दखल घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
येरवडा परिसरातील फुलेनगर-नागपूर चाळ परिसरातील विविध समस्यांची पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी सोमवारी संबंधित परिसराला भेट दिली. यावेळी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पथ विभागचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे, परिमंडळ उपायुक्त माधव जगताप, येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम यांच्यासह मंगेश गोळे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, भगवान जाधव, माजी नगरसेविका नंदा कांबळे आदी उपस्थित होते.
आयुक्तांनी केलेल्या पाहणीमध्ये उड्डाणपुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पडल्याचे तसेच नदीपात्रामध्ये राडारोडा टाकल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत आयुक्त राम म्हणाले, ‘‘राडारोड्यामुळे नदीपात्र आकुंचित होऊन परिसराला पुराचा फटका बसतो. त्यामुळे या प्रकाराची गांभीर्याने चौकशी केली जाईल. त्यासंबंधीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील, तसेच त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.’’ दरम्यान, बार्टीच्या शाळेसमोरील कचरा फीडर पॉइंट इतरत्र स्थलांतरित करावा, बंद पडलेली बीआरटी काढून टाकावी, याकरिता प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी केली.

आयुक्तांनी केलेल्या सूचना
- डॉ. आंबेडकर चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी आराखडा तयार करावा
- स्वच्छतागृहाचे तत्काळ स्थलांतर करावे
- कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी
- विकास आराखड्यातील रस्त्यांच्या भूसंपादनासाठी पाठपुरावा करावा
- चंद्रमानगर येथील घरांकरिता जागा हस्तांतराबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT