पुणे, ता. २५ : केंद्र सरकारने येथील स्मार्ट सिटी प्रकल्प बंद केल्यानंतर तो सुरू ठेवायचा की बंद करायचा?, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेने याबाबत राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागितले होते, पण त्यावर उत्तर मिळाले नाही. मात्र, स्मार्ट सिटीतील कर्मचाऱ्यांची गळती सुरू झाली आहे, अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली.
केंद्राने शहरांचा सुनियोजित विकास करण्यासाठी व उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करून नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी स्मार्ट सिटी मिशन जाहीर केले. यामध्ये पुणे शहराचा समावेश केला होता. पुण्यातील औंध, बाणेर, बालेवाडी परिसरात अनेक प्रकल्प सुरू केले. त्यासाठी सुमारे ९०० कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटीला दिला होता. मात्र, वर्षभरापूर्वी केंद्राने स्मार्ट सिटी प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे त्यांचे प्रकल्प पुणे महापालिकेकडे हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. यातील काही प्रकल्प पांढरे हत्ती ठरत असून, ते सुरू ठेवायचे की बंद करायचे?, याबाबत महापालिकेने राज्य सरकारकडे विचारणा केली आहे; पण त्यावर उत्तर मिळालेले नाही. याबाबत कोणतेही स्पष्ट धोरण नसल्याने तेथे ठेकेदारीपद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्येही नोकरीच्या सुरक्षेबाबत संभ्रम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.