पुणे

पोलिसभरती परीक्षेत डमी बसविणाऱ्याला अटक

CD

पुणे, ता. ९ ः पुणे शहर पोलिस दलात भरतीसाठी २०१६ मध्ये झालेल्या परीक्षेत स्वतःच्या जागी सख्ख्या भावाला डमी बसवून लेखी परीक्षा द्यायला सांगणाऱ्या उमेदवाराला पोलिसांनी तब्बल नऊ वर्षांनंतर अटक केली आहे. डमी म्हणून परीक्षा देणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक भावाला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे.
गजानन शिवलाल गुसिंगे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा भाऊ सुप्पडसिंग गुसिंगे (दोघे रा. कौचलवाडी, रोहिलागड, ता. अंबड, जि. जालना) याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. या दोघांविरोधात तोतयेगिरी, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासविणे, कट रचणे या भारतीय दंड संहितेच्या कलमांसह परीक्षांमधील गैरप्रकारास प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ एप्रिल २०१६ ला शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानात झालेल्या परीक्षेत या भावांनी हा प्रकार केला होता.
या भरती प्रक्रियेत आरोपी गजानन गुसिंगे सहभागी झाला. त्याने पाच व सहा एप्रिल २०१६ रोजी मैदानी चाचणी परीक्षा दिली. त्यानंतर २४ एप्रिलला लेखी परीक्षेसाठी स्वतःऐवजी डमी व्यक्तीला बसविले. त्यासाठी बनावट ओळखपत्रेही तयार केली. या परीक्षेच्या चित्रीकरणातून गजाननच्या जागी सुप्पडसिंगने परीक्षा दिल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, सुप्पडसिंग हा २०२३ मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिस दलात भरती झाला आहे.
दरम्यान, डमी म्हणून परीक्षा देण्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रे कोठून तयार केली, त्यांना कोणी मदत केली, याचा तपास करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT