पुणे

ग्रामस्तरावरील व्यवसाय विकास प्रशिक्षण

CD

शेतमाल व अन्न प्रक्रिया, कुटीरोद्योग, गृहोद्योग, स्थानिक व नैसर्गिक संसाधनांवरील प्रक्रियाआधारित उद्योग इत्यादी विविध प्रकारचे उद्योग व व्यवसाय करण्यासाठी इच्छुक गावातील होतकरू, उद्यमशील युवावर्ग, महिला, शेतकरी यांच्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. गावामध्येच ग्रामपंचायत किंवा स्थानिक संस्थांच्या माध्यमातून या व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासाठी सकाळ व ॲग्रोवन संलग्न प्रशिक्षण संस्था असलेल्या सिमासेस लर्निंगद्वारे (SIILC) ही प्रशिक्षण सेवा उपलब्ध केली जात आहे. गावामध्ये अशा प्रकारचे व्यवसाय विकास प्रशिक्षण आयोजित करण्याची तयारी असलेल्या ग्रामपंचायती तसेच स्थानिक संस्थांनी सिमासेस लर्निंगला संपर्क साधावा.
संपर्क : ८९५६७१२६३१

हीलिंग गार्डन ऑनलाइन व्याख्याने
मन, शरीर आणि आत्मा यांचे पालनपोषण करणाऱ्या हीलिंग गार्डनविषयी माहिती देणारी ऑनलाइन व्याख्याने १५ डिसेंबरपासून आयोजिली आहेत. खास आरोग्य व तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आयुर्वेदिक उपचारात्मक वनस्पतींची लागवड असणारी हीलिंग गार्डन ही संकल्पना आहे. आराम, तणाव कमी करणे आणि भावनिक उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी व निसर्गाचे उपचारात्मक स्वरूप समजण्यास हीलिंग गार्डन मदत करते. ही कार्यशाळा लँडस्केप आर्किटेक्चर, गार्डन डिझायनर, आरोग्यसेवा व मानसशास्त्र संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक आणि उत्साही लोकांसाठी उपयुक्त आहे. कार्यशाळेत हीलिंग गार्डनचे डिझाईन प्रिन्सिपल, बायोफिलिक डिझाईन व नेचर इंटिग्रेशन, उपचारात्मक वनस्पतींचा परिचय व लागवड व्यवस्थापन आदींबाबत माहिती दिली जाईल.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२

पेस्ट कंट्रोल व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा
पेस्ट कंट्रोल व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी, तसेच विद्यमान टेक्निशियन व फॅसिलिटी मॅनेजमेंट क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा १९, २० व २१ डिसेंबर रोजी आयोजिली आहे. यामध्ये पेस्ट मॅनेजमेंटची मूलभूत तत्त्वे, विविध कीटकांची ओळख, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, रसायनांचा सुरक्षित वापर, आवश्यक उपकरणांची माहिती तसेच शासन नियम याबाबत सखोल मार्गदर्शन मिळेल. यासह प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, व्यवसाय नोंदणी व परवाने, टेंडर प्रक्रिया, किंमत ठरविणे, एएमसी करार, तसेच डिजिटल मार्केटिंगद्वारे ग्राहक मिळविण्याचे कौशल्य आदींबाबतही माहिती दिली जाणार आहे. नवीन उद्योजक, टेक्निशियन, हॉस्पिटॅलिटी, सिक्युरिटी व लेबर कॉन्ट्रॅक्टर व्यावसायिकांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७

रिअल इस्टेट एजंटसाठी डिजिटल मार्केटिंग
खास रिअल इस्टेट एजंटसाठी केंद्रित २० तासांची डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा २९ डिसेंबरपासून आयोजिली आहे. रिअल इस्टेट एजंटना स्वतःच्या अथवा ते ज्या बांधकाम व्यवसाय कंपनीसाठी काम करतात त्यांच्या व्यवसायाची मार्केटिंग करायची असेल तर आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग एवढे प्रभावी मार्केटिंग तंत्र उपलब्ध नाही. कोणत्याही कंपनीच्या किंवा संस्थेच्या प्रगतीत मार्केटिंग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. बांधकाम व्यवसाय क्षेत्रात कंपनीचे उत्पादन विकण्यासाठी हे डिजिटल मार्केटिंगचे तंत्र कसे वापरावे तसेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग अशा विविध तंत्रांचा उपयोग डिजिटल मार्केटिंग कसे करावे याचे प्रगत मार्गदर्शन प्रात्यक्षिकासहित कार्यशाळेत होणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ४,९९९ अधिक जीएसटी.
संपर्क : ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

Salman Agha Runout: आधी रनआऊट झाला अन् मग हेल्मेट फेकलं... पाकिस्तानच्या सलमान आघावर ICC ची कारवाई

Maharashtra State Cooperative Bank : राज्य बँक ठरली यूपीआय स्वीकारणारी देशातील पहिली शिखर बँक

LPG Gas: गॅस तुटवड्याच्या काळात उज्ज्वला गॅस योजनेचं काय झालं? खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा, म्हणाल्या...

VIDEO : लिफ्टमध्ये अडकला सात महिन्यांच्या चिमुकल्याचा हात, पुण्यातील घटना; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर...

SCROLL FOR NEXT