पुणे

श्री कसबा गणपती मंदिर १५ डिसेंबरपासून बंद

CD

पुणे, ता. १० ः ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिरातील मुख्य गणेश मूर्तीच्या शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेस सोमवारपासून (ता. १५ ) प्रारंभ होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत किमान तीन आठवडे मंदिर सर्व भाविकांसाठी बंद राहणार आहे. मंदिराच्या आतापर्यंतच्या उपलब्ध असलेल्या इतिहासात अशी प्रक्रिया प्रथमच घडत असल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक ठकार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी देवस्थानचे खजिनदार हेरंब ठकार, विश्वस्त संगीता ठकार, स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मिहीर ठकार, मंदार ठकार, तेजस ठकार, हर्षद ठकार आदी उपस्थित होते.
ठकार म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांपासून या ऐतिहासिक स्वयंभू श्रीं च्या मूर्तीवरील शेंदूर मिश्रित कवच गळून पडत आहे. त्यामुळे भविष्यात अनपेक्षित प्रसंग उद्भवू नये, म्हणून सध्या असलेले शेंदूर कवच लवकर काढणे आवश्यक आहे. यासाठी शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रिया करण्यात येणार आहे. या कार्यासाठी साधारण तीन आठवडे लागणे अपेक्षित आहे. ’’ होणाऱ्या कामाचा योग्य आढावा घेऊन मंदिर लवकरात लवकर भाविकांसाठी खुले करण्यात येईल, असे व्यवस्थापन समितीने म्हटले आहे.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Mhaishale Case Sangli : सांगलीत लपला होता रोहित म्हैशाळे हत्याकांडाचा 'मास्टरमाइंड'; कोण आहे 'गोट्या'? त्याचा दलित महासंघाच्या नेत्याच्या खुनाशीही संबंध?

Bigg Boss Marathi 6 : या आठवड्यात टोळीमधून होणार धक्कादायक एव्हिक्शन ! सगळ्यांना भिडणारी 'ही' स्पर्धक बाहेर

Latest Marathi News Live Update : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हा उपाध्यक्षांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा

Mumbai News: कपडे फाटेपर्यंत मारेन…, महिला ट्रॅफिक पोलिसांसोबत प्रवाशाचे अश्लील वर्तन; मुंबईत नेमकं काय घडलं? VIDEO VIRAL

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

SCROLL FOR NEXT