पुणे

पुणे पुस्तक महोत्सवात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

CD

पुणे, ता. १० : पुस्तकांची तब्बल ८०० दालने, सांस्कृतिक-साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी...अन्‌ लहान मुलांसाठी ‘चिल्ड्रेन कॉर्नर’सह विविध स्पर्धा आणि कार्यशाळांची मांदियाळी असणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाचे येत्या शनिवारी (ता. १३) उद्‌घाटन होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्‍वास पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन १३ ते २१ डिसेंबरदरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. ‘‘पुण्याला पुस्तकांची राजधानी होण्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी या महोत्सवात पुणेकरांनी सहभाग घ्यावा,’’ असे आवाहन महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले. यावेळी संयोजन समितीचे सदस्य प्रसेनजित फडणवीस उपस्थित होते.

पाच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन
राजेश पांडे म्हणाले, ‘‘महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी शहरातील विविध महाविद्यालयांतर्फे ‘ज्ञानसरिता’ ग्रंथदिंडी काढण्यात येईल. भारतीय ज्ञान प्रणाली या संकल्पनेवर आधारित ही दिंडी असणार आहे. यात ७५ महाविद्यालयांच्या विविध विषयांवर दिंड्या राहणार आहेत. या दिंडीची सुरुवात दुपारी अडीच वाजता मॉडर्न महाविद्यालयातून होणार असून, सायंकाळी पाच वाजता ही दिंडी फर्ग्युसन महाविद्यालयात पोचेल. त्यानंतर पाच हजार विद्यार्थी आणि नागरिकांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्‌घाटन होईल.’’

अशी असेल दालनांची रचना
९००
- एकूण दालने

८००
- पुस्तकांची दालने

१००
- खाद्यपदार्थांची दालने

चिल्ड्रेन कॉर्नर ठरणार आकर्षक
यंदा महोत्सवात ‘चिल्ड्रेन कॉर्नर’चे मोठं आकर्षण असणार आहे. चित्रकला, वक्तृत्व, गायन, निबंध अशा स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी होतील. पुस्तक लिखाणावर कार्यशाळादेखील होणार असून, यात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे, असे प्रसेनजित फडणवीस यांनी सांगितले.

भगवान बिरसा मुंडा यांच्यावर विशेष दालन
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त महोत्सवात विशेष दालन साकारण्यात येणार आहे. या दालनात त्यांचा जीवनपट उलगडण्यात येईल. यात एक लाखांपेक्षा अधिक आदिवासी शब्दांचे प्रदर्शन मांडले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Dream Unfulfilled : ‘’धर्मेंद्र यांचे ‘ते’ स्वप्न अर्धवटच राहिले...’’, हेमा मालिनींनी प्रार्थना सभेत केला खुलासा!

IND vs SA, 2nd T20I: शुभमन गिलचा घरच्या मैदानावरही भोपळा! संजू सॅमसनला आता तरी खेळवा, चाहत्यांची मागणी

Viral : किती खाणेरडापणा! 19 मिनिट 30 सेकंद व्हिडिओचा पार्ट 2 व्हायरल? शेअर होतीये लिंक; पोलिसांची वॉर्निंग

Navale Bridge Accident: पुण्यातल्या नवले पुलाजवळील अपघात रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक; घेतला 'हा' निर्णय

Pune Harassment Case : गणेश पार्क ते लोहगाव परिसरात महिलांची छेडछाड करून पाळायचा; शेवटी आरोपी विमानतळ पोलिसांच्या सापळ्यात!

SCROLL FOR NEXT