पुणे, ता. १२ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिक्त विद्याशाखा अधिष्ठाता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या अर्जासाठी शुक्रवारपर्यंत (ता. १२) अंतिम मुदत होती. आता ही मुदत २८ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार आता विद्यापीठातील विद्याशाखा अधिष्ठाता पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत १३ ते २८ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या उमेदवारांनी प्रत्यक्ष अर्ज प्रशासन शिक्षकेतर कक्षाकडे सादर करण्यासाठी पाच जानेवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी दिली.