पुणे, ता. १२ ः शहरात कार्यरत असलेल्या फ्रान्स मित्र मंडळातर्फे फ्रान्समधील सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक असे वैविध्यपूर्ण पैलू जाणून घेण्यासाठी मे २०२६ मध्ये फ्रान्सला जाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी पुण्याहून तीन व्यक्तींचा गट पाठवण्यात येणार असून यासाठीचा खर्च आपापला करावा लागणार आहे, अशी माहिती फ्रान्स मित्र मंडळातर्फे डॉ. सतीश देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे. यासाठी सोमवारपर्यंत (ता. १५) अर्ज करायचे असून निवडीसाठी मंगळवारी (ता. १६) मुलाखत घेण्यात येणार आहे. या बाबतची अधिक माहिती शिवाजीनगरमधील मॉडेल कॉलनी येथील ‘वनस्थळी’च्या कार्यालयात मिळेल, अशी माहिती डॉ. सतीश देसाई, डॉ. वीणा दीक्षित यांनी दिली.