पुणे

पोलिस भरतीत ‘एआय’चा वापर

CD

पुणे, ता. १४ ः पोलिस भरतीप्रक्रियेत आणखी पारदर्शकपणा येण्यासाठी पुणे पोलिसांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यात येणार आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. परीक्षेत ‘फेस रेकग्निशन’ कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे लेखी, मैदानी चाचणी स्पर्धेत तोतया उमेदवार सहभागी होत असल्यास त्याला थांबवता येणार आहे.
पुणे पोलिस दलातील एक हजार ८३३ पोलिस शिपाई पदाच्या जागांसाठी आत्तापर्यंत ८६ हजार २४० अर्ज दाखल झाले आहेत. कारागृह विभागातील शिपाई पदाच्या १३० जागांसाठी ९० हजार ७९१ अर्ज दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर या भरतीप्रक्रियेसाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

असा रोखला जाणार गैरप्रकार
बऱ्याचदा भरतीप्रक्रियेत गोंधळ उडतो; तसेच मैदानी चाचणी स्पर्धेत काही उमेदवार गैरप्रकार करतात. मूळ उमेदवाराऐवजी दुसरे उमेदवार मैदानी स्पर्धेत सहभागी होतात. त्यामुळे यंदा भरतीप्रक्रियेत ‘फेस रेकग्निशन’ कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे. उमेदवारांची छायाचित्रे, त्यांची माहिती या कॅमेऱ्यांकडे असणार आहे. मूळ उमेदवाराऐवजी दुसरी व्यक्ती सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्वरित सूचना दिली जाणार आहे.

एआय ही कामे करणार
- शारीरिक मोजमाप
- स्वच्छतागृहातून बाहेर पडणारे उमेदवारांचे चेहरे टिपले जाणार
- उमेदवारांनी किती वेळेत अंतर पूर्ण केले यासाठी मैदानावर सेन्सर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT