पुणे

महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे पुरस्कारांची घोषणा

CD

पुणे, ता. १६ : सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या साहित्य आणि समाजकार्य पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. यात यंदाचा ‘दिलीप वि. चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक अरुण खोपकर यांना जाहीर झाला आहे, तर ‘समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार’ नागपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या लीला चितळे यांना जाहीर झाला आहे.
‘मासूम’ संस्थेच्या मनीषा गुप्ते, डॉ. रमेश अवस्थी, ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ आणि पुरस्काराचे समन्वयक मुकुंद टाकसाळे यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. याचे वितरण १७ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते होणार आहे.
समाजकार्य क्षेत्रातील ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार’ पश्चिम बंगालमधील मनीष राय चौधरी यांना, सामाजिक कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार हा गडचिरोली येथील प्रा. जावेद पाशा यांना आणि सामाजिक कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार हा पुण्यातील दत्ता देसाई यांना जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रातील ‘ललित ग्रंथ पुरस्कार’ हा मुंबईच्या निखिलेश चित्रे यांना ‘गॉगल लावलेला घोडा’ या कथासंग्रहासाठी, ‘वैचारिक किंवा अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार’ सोलापूरच्या विनय नारकर यांना ‘वस्त्रगाथा’ या ग्रंथासाठी आणि ‘रा. शं. दातार नाट्यलेखन पुरस्कार’ पुण्याच्या ऋत्विक व्यास यांना ‘पाचमजली हॉस्पिटल’ या संहितेसाठी जाहीर झाला आहे.
यातील जीवनगौरव पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी दोन लाख रुपये व मानचिन्ह, डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये व मानचिन्ह आणि अन्य सर्व पुरस्कारांचे स्वरूप ५० हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला नागरिक, काही वेळापूर्वीच म्हणाल्या होत्या, मॅनहोल उघडे ठेवल्यास कारवाई करू; VIDEO समोर

सोनम ते सिया व्हाया मुस्कान! प्रेमात आंधळं होत पतीला संपवलं, कुणी तुकडे केले, कुणी ड्रममध्ये भरलं, तर कुणी दरीत ढकललं...

Latest Marathi News Live Update : संत मुक्ताबाईंच्या मानाच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

Pune Lonavala Railway: पुणे विभागाचा मोठा निर्णय! दररोज दोन लाख प्रवाशांना दिलासा; पुणे-लोणावळा मार्गावर मोठे रेल्वे काम सुरू

लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर...

SCROLL FOR NEXT