पुणे

पुण्यातून धावल्या ९६ रेल्वेच्या ९६४ विशेष फेऱ्या सर्वाधिक फेऱ्या दानापूरसाठी ः दोन लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक

CD

पुणे, ता. १८ ः रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत वर्षभरात पुण्याहून ९६ रेल्वेच्या तब्बल ९६४ विशेष फेऱ्या पूर्ण केल्या. त्यातून दोन लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक झाली. पुण्याहून सर्वाधिक रेल्वेच्या फेऱ्या दानापूरसाठी झाल्या आहेत. पुणे ते दानापूरदरम्यान रेल्वेच्या ६७ फेऱ्या झाल्या असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
पुणे रेल्वे प्रशासनाने २०२५ मध्ये विविध सण, उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात वाढती गर्दी लक्षात घेता गर्दीच्या मार्गावर विशेष रेल्वे गाड्या सोडल्या. यामुळे पुण्याहून उत्तर भारतासह देशातील व राज्यातील अन्य भागांत जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
--------------
या मार्गांवर धावल्या अतिरिक्त रेल्वे :
- पुणे ते दानापूर ः ६७ फेऱ्या
- पुणे ते गोरखपूर : ६५
- दौंड- कलबुर्गी : ६४ फेऱ्या
- कोल्हापूर- कलबुर्गी : ४९ फेऱ्या
- हडपसर- लातूर : ३७ फेऱ्या
-----------------
या काळात धावल्या सर्वाधिक रेल्वे : शहरे
- दिवाळी : ३० हून अधिक फेऱ्या : दानापूर, गोरखपूर, निजामुद्दीन
- उन्हाळी विशेष : २४० हून अधिक फेऱ्या : नागपूर, इंदूर, दानापूर कलबुर्गी
- आषाढी वारी ः ३४ फेऱ्या ः कलबुर्गी, कुर्डुवाडी, लातूर
- गणपती उत्सव : ६ फेऱ्या : रत्नागिरी
----------
‘‘प्रवाशांची सोय व्हावी, या हेतूने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असलेल्या मार्गांवर अतिरिक्त गाड्या सोडल्या. पुणे विभागाने ९६ विशेष रेल्वेच्या माध्यमातून ९६४ फेऱ्या केल्या. यात दोन लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक झाली आहे.
- हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओला-उबर प्रवाशांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे चार नवे निर्देश; धोरणात मोठे बदल

Peshwa Descendants : पेशव्यांचे वंशज सध्या कुठे आहेत? कशी आहे त्यांची आत्ताची परिस्थिती..पाहा इतिहासातून वर्तमानाचा उलगडा

बाबर आझम जर तुमचा प्रमखु खेळाडू असेल...; भारताच्या माजी कर्णधाराने केला पाकिस्तानचा अपमान! म्हणाले, भारताची 'C' टीम यांना हरवेल

लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी ६; खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Vaibhav Suryavanshi 10th Exam : वैभव सूर्यवंशी दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसणार नाही; जाणून घ्या त्यामागचं कारण...

SCROLL FOR NEXT