पुणे

श्रीमद् ‍भागवत कथा कार्यक्रमाचे इस्कॉनतर्फे हडपसरमध्ये आयोजन

CD

पुणे, ता. २३ : हरे कृष्ण उत्सवांतर्गत ‘श्रीमद् भागवत कथा’ या कार्यक्रमाचे आयोजन इस्कॉन पुणेतर्फे २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दररोज सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत हडपसर येथील भोसले गार्डन येथे होणार आहे, अशी माहिती इस्कॉनचे केशव दास यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी हरिनाम कीर्तन, भक्तिनाटिका, प्रवचने, तसेच पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवांतर्गत युवकांसाठी विशेष ‘उडान महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून, तो २८ डिसेंबरला दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत होईल. युवकांच्या सध्याच्या समस्या, तणाव, व्यसनाधीनता, दिशाहीनता व जीवनातील आव्हाने यांवर मार्गदर्शन सत्र होतील, तसेच महोत्सवाचे मुख्य प्रवक्ते म्हणून कृष्ण चैतन्य स्वामीमहाराज उपस्थित राहणार असून, सुमधुर नामसंकीर्तन (रॉक बँड स्वरूपात), नाटिका, प्रश्नोत्तर सत्र यांचा समावेश असणार आहे. भागवत कथेस विश्वविख्यात कथाव्यास परमपूज्य लोकनाथस्वामी कथाकथन करणार आहेत, अशी माहिती केशव दास यांनी दिली. या वेळी उद्धव दास, मुकुंद माधव दास, रामटेके दास, नीलेश प्रभू आदी उपस्थित होते. हे कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Cotton Market : कापूस बाजारात 'मंदीची' सरकी; १५ लाख गाठींचे उद्दिष्ट असताना साडेसात लाखांवरच हंगाम आटोपला!

रायगडाच्या पायवाटेवर 'कमळी'चा स्वराज्याचा जागर! चित्रीकरणादरम्यान विजया बाबर झाली भावूक; म्हणाली...

Jalgaon News : जळगावात थरार! सिलिंडरच्या स्फोटात तीन घरे जळून खाक, डोळ्यांदेखत संसाराची झाली राखरांगोळी

Latest Marathi News Update : धक्कादायक! जळगाव जिल्ह्यात ‘दूषित’ पाणीपुरवठा

Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT