पुणे

पाठ्यवृत्तीमुळे झेडपीच्या कामाचा घेता येणार अनुभव

CD

पुणे, ता. २५ : जिल्हा परिषदेत पाठ्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेतून विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाच्या कामाचा अनुभव घेता येणार आहे. पहिल्या टप्प्यात २५ विद्यार्थ्यांना अकरा महिन्यांसाठी नियुक्त केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

पहिल्या टप्प्यात निवड केलेल्या २५ विद्यार्थ्यांना दरमहा २५ हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. यामुळे तरुणांना प्रत्यक्ष जिल्हा प्रशासनात काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. त्यांना शासनाची कार्यपद्धती, योजना अंमलबजावणी आणि धोरण रचना याचा प्रत्यक्ष परिचय होईल. यामुळे प्रशासनाला तरुणांच्या नावीन्यपूर्ण दृष्टिकोनाचा लाभ होणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, कृषी, जलसंधारण, महिला व बालविकास, डिजिटल प्रशासन आणि सामाजिक कल्याण यांसारख्या क्षेत्रांमध्ये संशोधन व धोरणात्मक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांवर स्थानिक समस्यांवर प्रभावी उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी असेल. त्याचबरोबर तरुणाईकडे असलेल्या माहिती विश्लेषण, तांत्रिक सुधारणा आणि धोरणात्मक संशोधन, संगणक प्रणालीचा वापर करून नव्या संकल्पनांचा जिल्हा परिषदेला फायदा होईल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FACT CHECK : इशान किशन, अभिषेक शर्मा यांचा SRH कडून IPL 2026 खेळण्यास नकार? काव्या मारनचा नोंदवला निषेध... जाणून घ्या सत्य

MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा का साजरा केला जातो माहीत आहे? जाणून घ्या सणाचा इतिहास आणि महत्त्व

Latest Marathi News Live Update : ऑनलाइन शॉपिंग पडली महागात ! महिलेची 98000ची फसवणूक

"सगळा एडिटचा खेळ" करणसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्राजक्ताने सोडलं मौन ; "आमच्या दोघांमध्ये.."

SCROLL FOR NEXT