पुणे

‘वंचित’कडून ४१ जागांची मागणी

CD

पुणे, ता. २४ : महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीकडे वंचित बहुजन आघाडीने ४१ जागांची मागणी केली आहे. सध्या महाविकास आघाडीसोबत युतीसाठी चर्चा सुरू असून, काँग्रेससोबतची प्राथमिक बैठक पूर्ण झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतची महत्त्वाची बैठक बुधवारी रात्री उशिरा होणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. आत्तापर्यंत ‘वंचित’ने जागांसंदर्भात कोणताही लेखी प्रस्ताव दिला नसून केवळ तोंडी चर्चा सुरू आहेत.
पुणे महापालिकेत महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी २०१७ मधील निवडणुकीत जिंकलेल्या जागांव्यतिरिक्त नव्या जागांचा विचार करण्याची मागणीही ‘वंचित’ने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बुधवारी उशिरा वंचित आघाडीची बैठक होणार होती, या बैठकीला जाण्यापूर्वी ‘वंचित’चे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे म्हणाले, ‘‘आम्ही सुप्रिया सुळे यांच्याशी ४१ जागांची चर्चा करणार आहोत. आमचा सन्मान राखला जावा एवढीच अपेक्षा आहे.’’
दरम्यान, या बैठकीतही जागांची तोंडी मागणी करण्यात येणार असून, संभाव्य युतीची रूपरेषा निश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच ‘वंचित’कडून गुरुवारी लेखी प्रस्ताव महाविकास आघाडीतील पक्षांना दिला जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT