पुणे

स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे ग्राहक दिन उत्साहात

CD

पुणे, ता. २४ : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे महानगरचे अध्यक्ष विलास लेले, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य ॲड. तुषार झेंडे, सदस्या ॲड. अनिता गवळी आदी उपस्थित होते.
ग्राहकांचे फसवणुकीपासून संरक्षण करण्यासोबत त्यांच्या हक्काबाबत जागरूक करणे तसेच त्यांची फसवणूक झाल्यास ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, याचा नागरिकांना लाभ घ्यावा, असे आवाहन सुधळकर यांनी केले. लेले म्हणाले, ‘‘ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यामार्फत ग्राहकांना मोफत सल्ला देण्यात येतो.’’
ग्राहकांची फसवणूक झाल्यास १९१५ या हेल्पलाइन क्रमांक किंवा e-jagriti.gov.in या संकेतस्थळाद्वारे तक्रार दाखल करता येते, असे आवाहन ॲड. झेंडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, याचिका फेटाळली, काय दिलं कारण?

NEET (UG) 2026: नीट (यूजी) २०२६ अर्जातील दुरुस्तीची संधी; १४ मार्चपर्यंत तपशील बदलता येणार

Pune News: युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत टोमॅटो, कांद्याचे भाव वाढले; आयात तात्पुरती थांबली, टोमॅटो अडीचशे तर कांदा पावणे दोनशे रुपये किलाे!

Thane News: ठाणेकरांसाठी मोठा दिलासा! प्रॉपर्टी टॅक्सच्या दंडावर तब्बल 90% सूट जाहीर; अंतिम मुदत किती? जाणून घ्या...

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

SCROLL FOR NEXT