पुणे, ता. २४ ः पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी आम आदमी पक्षाचे प्रभाग ३४मधील उमेदवार शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. उर्वरित ४० प्रभागांत अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. दरम्यान, बुधवारी तीन हजार ५५१ नामनिर्देश पत्रांची विक्री झाली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू झाली असून ३० डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. सर्वांत जास्त नामनिर्देशन अर्जांची विक्री हडपसर-मुंढवा कार्यालयातून ४२९ एवढी झाली आहे. तर सर्वांत कमी कोंढवा-येवलेवाडी कार्यालयातून ८८ अर्ज विकले गेले आहेत. सर्वच क्षेत्रीय कार्यालयातून अर्ज विक्री झालेली असली तरी केवळ एक उमेदवारी अर्ज भरला गेला आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी महापालिकेकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. आत्तापर्यंत दोन हजार ९३८ जणांनी अर्ज केले आहेत. त्यातील एक हजार ७७९ जणांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
दरम्यान, शुक्रवारपासून राजकीय पक्षांची उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारी, सोमवारी, मंगळवारी या तीन दिवसांत अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडणार आहे.
प्रमाणपत्रासाठी पिळवणूक
महापालिका निवडणुकीसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवार धावपळ करत आहेत. परंतु महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी इच्छुकांची मुस्कटदाबी करत आहेत. ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयात महापालिकेच्या कामाचा फटका इच्छुकांना बसत आहेत. आमचा जाहिरात फलक पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत असताना त्यावर कारवाई करून बेकायदेशीर दंड लावला आहे. प्रमाणपत्र देताना त्यासाठी पिळवणूक सुरू आहे. याबाबत आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या अनुसूचित जाती आघाडीचे शहरप्रमुख मिलिंद आहिरे यांनी दिला आहे.
क्षेत्रीय कार्यालय-व्रिकी झालेल्या अर्जांची संख्या
- येरवडा-कळस-धानोरी-४००
- नगर रोड-वडगावशेरी-३८१
- कोथरूड-बावधन-२७२
- औंध-बाणेर-१६८
- शिवाजीनगर-घोले रोड-२०६
- ढोले-पाटील रोड-२१६
- हडपसर-मुंढवा-४२९
- वानवडी-रामटेकडी-१९२
- बिबवेवाडी-२००
- भवानी पेठ-२५८
- कसबा-विश्रामबाग वाडा-१२४
- वारजे-कर्वेनगर-१७२
- सिंहगड रोड-२१३
- धनकवडी-सहकारनगर-२३२
- कोंढवा-येवलेवाडी-८८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.