पुणे

बँकांतील विनादावा ठेवींबाबत प्रसिद्धी करावी

CD

पुणे, ता. ८ : जिल्ह्यातील बँकांमध्ये गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून दावा न केलेल्या (अनक्लेम्ड डिपॉझिट) ६५९ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, अशी माहिती बँकर्स जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत समोर आली. त्यावर सदर रकमेची मागणी संबंधितांनी करावी, यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे जिल्हा अग्रणी बँकेने बँकनिहाय यादी द्यावी. तसेच त्याविषयी प्रसिद्धी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बँकांना दिल्या.
जिल्ह्यातील बँकर्सची जिल्हा सल्लागार समिती (डीसीसी) आणि जिल्हास्तर आढावा समितीच्या (डीएलआरसी) बैठक जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक तथा जिल्हा अग्रणी अधिकारी अक्षय कोंडेकर, बँक ऑफ महाराष्ट्राचे उपमहाप्रबंधक रामचंद्र रागिरी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत पाटील यांनी जिल्ह्यातील बँकामध्ये अनक्लेम्ड डिपॉझिट असून, ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती दिली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘‘जिल्ह्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, स्वयंरोजगार, कौशल्य विकासाच्या अनुषंगाने बँकेकडे कर्जमागणीबाबत प्रलंबित प्रकरणांचा विचार करता ती वेळेत मंजूर करावीत. त्यासाठी बँकांनी आपल्या शाखांच्या व्यवस्थापकांची बैठक घेऊन त्यांना कर्ज प्रकरणे मंजुरीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करावे. कर्ज नामंजूर करण्यावर भर न देता कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याकडे विशेष लक्ष द्यावे.’’

‘भेटवस्तू विक्रीसाठी प्रोत्साहन द्यावे’
‘उमेद’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू दिवाळी उत्सवासाठी भेटवस्तू म्हणून देण्याच्या उद्देशाने ८०० रुपयांपासून पुढील किमतीची किट तयार करण्यात आली आहेत. बँकांनी या भेटवस्तू विक्रीच्या दृष्टीने प्रोत्साहन द्यावे. या किटची मागणी ऑनलाइन करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Khedkar यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला! अपहरण, मारहाण आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीत राज्यातील उमेदवारांसोबत दुजाभाव; भरती प्रक्रियेतील शैक्षणिक अर्हतेसाठी दिले कमी गुण

Pune: पुणे पोलिसांना लायटर आणि पिस्तूलमधील फरक कळेना? हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघड

Mumbai: पात्र झोपडीधारकांऐवजी मृतांना घरे वाटली; झोपु योजनेतील बेदायदेशीर सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

''शबरीमलातील चोरीची सीबीआय चौकशी करा'' भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांची मागणी

SCROLL FOR NEXT