पुणे

यंदा पेरण्यांचे प्रमाण गतवर्षीपेक्षा अधिक

CD

पुणे, ता. २५ : राज्यात यावर्षी दमदार पावसाने खरीप हंगामाला बळ दिले असून, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पेरण्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी याच काळात राज्यात १९ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या तर, यावर्षी २३.२७ टक्क्यांपर्यंत पेरणी झाली आहे. आतापर्यंत ३३ लाख ५९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत.

पुणे विभाग राज्यात आघाडीवर असून, येथे सर्वाधिक म्हणजे चार लाख ५१ हजार ५०७ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मे महिन्यातच मॉन्सून दाखल झाला होता. मे आणि जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी पोषक वातावरण मिळाले. मात्र, सुरुवातीला वाफसा न झाल्यामुळे आणि मॉन्सूनची गती थांबल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई न करण्याचे आवाहन केले होते. तरीदेखील, शेतकऱ्यांनी योग्य वेळ साधून मोठ्या प्रमाणावर पेरण्या केल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. खरीप पिकांमध्ये भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफूल, सोयाबीन या पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. राज्यात सर्वाधिक पेरण्या पुणे विभागात तर, सर्वांत कमी पेरण्या कोकण विभागात झाल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.

राज्यात यंदा मॉन्सूनच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाल्याने पेरण्यांचे प्रमाण वाढले आहे. यादरम्यान, मागील वर्षी १९ टक्के पेरण्या झाल्या होत्या. यंदा २३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सध्या सर्वदूर पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना पेरण्यांसाठी फायदा होत आहे.
- रफिक नाईकवडी, संचालक विस्तार, कृषी विभाग

विभागनिहाय झालेल्या पेरण्या
विभाग - क्षेत्र (हेक्टर) - टक्केवारी
कोकण : १६,०७९ - ४.१०
नाशिक : ५,०९,१११ - २५.०४
पुणे : ४,५१,५०७ - ३५.९४
कोल्हापूर : १,६८,५६८ - २३.२६
छत्रपती संभाजीनगर : ६,५७,१९९ - ३०.६८
लातूर : ९,०४,२०२ - ३१.९४
अमरावती : ५,६१,८८० - १७.७८
नागपूर : ९०,५३५ - ४.७८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलगा दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणं असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत! हे शेअर्स चमकले; मात्र मोठ्या IPO ला ब्रेक का?

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

SCROLL FOR NEXT