पुणे

नवजात अर्भक मृतावस्थेत सापडले

CD

पुणे, ता. २५ : विमाननगर परिसरातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दिग्विजय देसाई (वय २३, रा. विमाननगर) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, विमाननगर येथील कोणार्कनगर फेज वन परिसरात बांधकाम मजुरांची वसाहत आहे. देसाई हे पर्यवेक्षक म्हणून काम करतात. मंगळवारी (ता. २४) दुपारी दोनच्या सुमारास महिलांच्या प्रसाधनगृहाजवळ साचलेल्या पाण्यात नवजात अर्भक आढळले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. नवजात अर्भकाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारांपूर्वीच अर्भकाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

Beed News: मानवत: घरासमोरील ऑटो रिक्षा पेटवली; १.४० लाखांचे नुकसान; पंधरा दिवसांतील दुसरी वाहन आग; कृष्ण मंदिर परिसर हादरला

Chhtrapati Sambhajinagar: वादळी पावसामुळे शहर अंधारात; ३०० महावितरण कर्मचारी रात्रभर दुरुस्तीवर

SCROLL FOR NEXT