पुणे

लोकसेवा इंग्लिश स्कूलतर्फे हुंडाबळीबाबत समाज प्रबोधन

CD

पुणे, ता. २८ : ‘हुंडा घेणाऱ्यांना विरोध करा, समाज बदलण्यास मदत करा’, ‘हुंडा नाकारू, समानतेचे नवे पर्व सुरू करू’, ‘हुंडा नाही प्रेम हवे, नवीन संसारात सुख हवे’ अशा घोषणा देत फुलगाव येथील लोकसेवा इंग्रजी माध्यम शाळेतर्फे ‘हुंडाबळी’ तसेच ‘स्त्री-भ्रूण हत्या’ याविरोधात प्रबोधन करण्यात आले. यानिमित्त शाळेने ‘बाहुला-बाहुली विवाह सोहळ्या’चे आयोजन केले होते. हुंडाबंदी म्हणजेच हुंडा देणे किंवा घेणे यावर कायद्याने बंदी आहे. हुंडा मागणी केल्यास शिक्षा होऊ शकते, असे फलक घेऊन वऱ्हाडींनी वाजत गाजत वर-वधू स्वरूपातील बाहुल्यांची मिरवणूक काढली. लग्नात वर-वधूंना शुभेच्छा म्हणून उपस्थितांनी झाडांच्या बिया, तुळशीची रोपे, पुस्तके, संगीताचे साहित्य, क्रीडा साहित्य आशीर्वाद स्वरूपात भेट दिले. सोहळ्यातील बाहुल्या ज्येष्ठ बाहुलीकार जयंत साठे यांनी साकारल्या होत्या. याप्रसंगी शाळेचे संस्थापक दीपक पायगुडे, संचालक नरहरी पाटील, सुरेश पाटील, अर्जुन शिंदे, मनीषा तिरकुंडे, अक्षय पोटे, प्रभाकर भडसावळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Village of Widows : विधवांचे गाव ! इथे ७० टक्के महिला तरुणपणीच गमावतात पती; काय आहे मृत्युचे धक्कादायक वास्तव?

बीडमध्ये हे काय चाललंय? थाळी एकच पण जेवले 50 जण, शिवभोजन थाळीत 'डिजीटल भ्रष्टाचार'

Patanjali: रामदेव बाबांना हायकोर्टाचा मोठा दणका; डाबर च्यवनप्राशची बदनामी करणाऱ्या जाहिरातींवर घातली बंदी

कर्नाटकातील काँग्रेस सरकार संकटात? उपमुख्यमंत्री DK शिवकुमारांनी घेतली महत्त्वाची भूमिका; म्हणाले, 'माझ्याकडे दुसरा पर्याय..'

Woman Doctor Ends Life : स्वतःवर ब्लेडने वार करून डॉक्टर महिलेनं संपवलं जीवन, पतीदेखील वैद्यकीय अधिकारी; धक्कादायक कारण समोर...

SCROLL FOR NEXT