पुणे

जुन्या इमारतींचा पुनर्विकास

CD

पुणे, ता. १ : यूडीसीपीआर नियमामुळे महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रीडेव्हलपमेंट) सुरु आहे किंवा होणार आहे. हा नियम काय आहे? त्यामुळे एफएसआय कसा व किती वाढला? त्याचा वापर कसा करायचा? व्यवहार्यता अहवाल कशासाठी काढतात? पीएमसी म्हणजे काय? आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा ५ जुलैला आयोजिली आहे. यामध्ये इमारतींचा पुनर्विकास करण्याची पद्धत, त्यासाठीचे पेपर्स, विकसक कसा निवडावा, जुन्या सभासदांना होणारे फायदे, करारनामा कसा करावा, महारेरा नोंदणी आदी सर्व मुद्यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. सोसायटी स्वयंपुनर्विकास करू इच्छिणारे, नवीन विकसक, ज्यांना पुनर्विकास क्षेत्रात रस आहे असे सर्वजण, स्थावर संपदा अभिकर्ते यांच्यासाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

बांधकाम क्षेत्रातील करिअर चर्चासत्र
बांधकाम प्रकल्प व्यवस्थापन हा विषय शिकविताना अनेक कौशल्यांचा जसे की प्रात्यक्षिके, बांधकाम प्रकल्पात काम करण्यासाठी आवश्यक व्यक्तिगत कौशल्ये आणि साईटवरील मनुष्यबळाचा योग्य वापर कसा करावा इ.घटकांचा अभाव दिसतो. दुसरीकडे याच कौशल्यांत पारंगत अशा उमेदवारांची वाढती मागणी आहे. याविषयीचे शिक्षण व नोकरीची संधी देणारा एक वर्षाचा आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण असलेला अभ्यासक्रम ऑगस्टमध्ये सुरू होत आहे. हा अभ्यासक्रम व या क्षेत्रातील नवीन करिअर संधींविषयी मार्गदर्शन करणारे विनामूल्य चर्चासत्र ६ जुलैला आयोजिले आहे. चर्चासत्राला क्रेडाईचे उपाध्यक्ष जे. पी. श्रॉफ, शापूरजी पालनजी ग्रुपचे स्ट्रॅटेजी व बिझनेस एक्सलन्स प्रमुख सागर गांधी, ओमान येथील अल कराराचे संचालक हेमंत सर्वभोटला मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ७७२००७५७६२, ७७५८८२५७३७

बना पेंटिंग व्यावसायिक
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक बांधकाम उद्योगात कुशल पेंटिंग व्यावसायिकांची मोठी गरज आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असणारे व्यावसायिक पेंटिंग कंत्राटदार प्रशिक्षण २ जुलैपासून सुरु होत आहे. यामध्ये २० तासांचे ऑनलाइन प्रशिक्षण, प्रात्यक्षिक ज्ञान, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि तीन क्षेत्र भेटींचाही समावेश आहे. यात १७ हून अधिक प्रकारच्या इमारत पेंटिंग यंत्रणा, १० हून अधिक टेक्सचर व स्टेन्सिल्स, ३२ हून अधिक कॉमन डिफेक्ट्स आणि त्यावरील उपाय, तसेच चार आंतरराष्ट्रीय पेंट कंपन्यांची चर्चासत्रे अनुभवता येणार आहेत. याशिवाय कलर थेरपी, निविदा प्रक्रिया, बिलिंग व खर्च नियोजन, मटेरिअल व्यवस्थापन अशा व्यावसायिक कौशल्यांचा समावेश केला आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

आयुर्वेदिक अभ्यंग मसाज कार्यशाळा
मसाज अथवा आयुर्वेदिक अभ्यंग केल्याने आरोग्यासंबंधी तक्रारी दूर होतात व वात-पित्त-कफाचे संतुलन राखले जाते. आरोग्याच्या जागृतीमुळे गेल्या काही वर्षांत सतत वाढत असणाऱ्या या क्षेत्रात तज्ज्ञ व्यावसायिकांची मागणी आहे. याबाबत मार्गदर्शन करणारी तीन दिवसीय कार्यशाळा ११, १२ व १३ जुलैला आयोजिली आहे. यात अभ्यंग मर्दन संकल्पना, मसाजचे तंत्र, मंत्र व शास्त्र, मसाजचे फायदे, वात-पित्त-कफ प्रवृतीनुसार मसाज, उपयुक्त औषधी तेले, शिरोभ्यंग, पादाभ्यंग, विविध स्ट्रोक्स, स्नेहन, स्वेदन, पावडर मसाज, उदवर्तन, मसाज केव्हा, कधी व किती वेळ करावा, कधी करू नये याबाबत प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Updates : मुंबईत पावसाचा जोर वाढला, लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने

Kalhapur Rain update: 'काेल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार'; पंचगंगेच्या पातळीत वाढ, २१८ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले

वापरलेल्या खाद्यतेलापासून बनणार विमानाचं इंधन, भारतात पहिला SAF प्लांट सुरू करण्यास इंडियन ऑइलला परवानगी

Asia Cup 2025: आधी खेळ सुधार! बाबर आझमला कोचची स्पष्ट ताकीद; पाकिस्तान संघातून हाकालपट्टीमागचं खरं कारणही सांगितलं

Ranthambore National Park : वाघांनी भरलेल्या घनदाट जंगलात पर्यटकांना अंधारात सोडून गाईड गेला पळून, ९० मिनिटांत जे घडलं...

SCROLL FOR NEXT