पुणे

फाइलसाठी लाच मागणाऱ्या लिपिकास अटक

CD

पुणे, ता. २ : फाइल गहाळ झाल्याचे सांगून ती शोधण्यासाठी तक्रारदाराकडून दीड हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने ताब्यात घेतले. ही कारवाई नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारातील उपाहारगृहाजवळ करण्यात आली.
योगेश दत्तात्रेय चवंडके (वय ३७) असे लाच मागणाऱ्या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराचा २०२२ मध्ये मोटार अपघात झाल्यानंतर त्यांनी नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीविरुद्ध ग्राहक तक्रार निवारण आयोगात दावा दाखल केला होता. या दाव्याच्या सुनावणीसाठी तक्रारदार आयोगात गेला असता, ‘तुमची फाइल गहाळ झाली आहे’, असे चवंडके याने सांगितले. त्यानंतर फाइल शोधून देण्याच्या मोबदल्यात चवंडकेने दोन हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर दीड हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार केली. चवंडकेने तक्रारदाराला मंगळवारी (ता. १) दुपारी उपाहारगृहाजवळ बोलावले. फाइल मिळाल्याचे सांगत लाच स्वीकारताना ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडले. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या २६ लाख लाभार्थी महिलांची सुक्ष्म छाननी; आदिती तटकरे यांची माहिती

Latest Marathi News Updates: राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार उद्या होणार

Pune Ganeshotsav : ध्वनिक्षेपकाला परवानगी! यंदा सात दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत ‘बजाव’

PM Narendra Modi: ''कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करू'', 'ट्रम्प टॅरिफ'वरुन मोदी स्पष्ट बोलले

AI Use in Ganeshotsav Crowd गणेशोत्‍सवातील गर्दीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी ‘एआय’चा वापर

SCROLL FOR NEXT