पुणे

महिला वाचकांसाठी ‘सकाळ मैत्रीण प्रश्नमंजूषा’

CD

पुणे, ता. ३ ः ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे महिला वाचकांसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांना सर्व स्तरातील महिलांकडून नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. याअंतर्गत महिला वाचकांसाठी ‘सकाळ मैत्रीण प्रश्‍नमंजूषा २०२५’ ही खास बक्षीस योजना सोमवारपासून (ता. ७) सुरू होत आहे. एकूण १०० दिवसांच्या कालावधीत ‘सकाळ’च्या अंकात ‘मैत्रीण’ नावाचे महिलांसाठी खास सदर (रविवार वगळता) प्रसिद्ध होईल. या सदरामध्ये आरोग्य, फॅशन, फूड, पर्यटन, करमणूक व करिअर आदी महिलांसंबंधीच्या विषयांवरील (सोमवार ते शनिवार दररोज एका विषयावर) लेख व सदरांचा समावेश असेल.
यातील मजकुरावर आधारित प्रश्‍नाचे कूपन या सदरात असेल. या सदराला जोडूनच महिलांसाठी याच नावाची आकर्षक बक्षीस योजनाही राबविली जाणार आहे. सहभागी महिलांनी या प्रश्‍नाचे उत्तर लिहून कूपन प्रवेशिकेमध्ये चिकटवायचे आहे. स्पर्धा कालावधीत एकूण १०० कूपन्स प्रसिद्ध होतील व त्यापैकी कोणतीही एकूण ८० कूपन्स स्पर्धकांनी जमा करावयाची आहेत. कूपन्सची आवश्यक संख्या, प्रश्‍नांची अचूक उत्तरे व सजावट या आधारे विजेत्यांची निवड केली जाईल. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. महिलांची ही मैत्रीण ज्ञानासोबत भरघोस बक्षिसेही देणारी आहे. कृपया जास्तीत जास्त मैत्रिणींनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. तसेच घरपोच अंक सुरू करण्यासाठी आपल्या नजीकच्या वृत्तपत्र विक्रेत्याशी किंवा ९८८१५९८८१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

अशी आहेत बक्षिसे
पहिले बक्षीस - सुझुकी ॲव्हेनीस १२५ सीसी स्कूटर्स - १०
दुसरे बक्षीस - फूड प्रोसेसर -१०
तिसरे बक्षीस - स्मार्ट वॉच - २५
चौथे बक्षीस - मिक्सर ग्राइंडर - २५
पाचवे बक्षीस - इलेक्ट्रिक केटल्स - ५०
तसेच १०० इंडक्शन कुक टॉप्स, १०० हँड ब्लेंडर्स आणि २०० टिफिन बॉक्सेसदेखील आहेत
याशिवाय प्रथम ३० हजार प्रवेशिका जमा करणाऱ्या महिलांना खास गिफ्ट व्हाउचर्स किंवा आकर्षक भेटवस्तू मिळणार आहेत.


हे लक्षात ठेवा
स्पर्धेचा कालावधी - ७ जुलै ते ६ नोव्हेंबर २०२५
१) स्पर्धेदरम्यान ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या ‘मैत्रीण’ या सदरावर आधारित दररोज (रविवारव्यतिरिक्त) एक कूपन प्रसिद्ध करण्यात येईल. यामध्ये एकूण १०० प्रश्‍न विचारण्यात येतील. या १०० पैकी कोणतीही ८० कूपन्स प्रवेशिकेत चिकटविणे आवश्यक आहे
२) ही स्पर्धा सर्व वयोगटांच्या महिलांसाठी खुली असेल
३) प्रवेशिकेवर स्पर्धकाने पूर्ण नाव व इतर तपशील (मोबाईल क्रमांकासह) सुवाच्य अक्षरात लिहावा
४) प्रवेशिका जमा करण्यासाठी नजीकच्या ‘सकाळ’ कार्यालयात बॉक्स ठेवले जातील. या बॉक्समध्ये १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्रवेशिका जमा कराव्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT