पुणे

‘पीएमपी’चे २५ कर्मचारी निलंबित

CD

पुणे, ता. ३ ः प्रवाशांची सोय व्हावी व ‘पीएमपी’चे उत्पन्न वाढावे यासाठी दुपारच्या सत्रातील बसच्या वाहतुकीवर ‘पीएमपी’च्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातले आहे. मुख्यालयात बसून असणाऱ्या विभाग प्रमुखांना आगारात पालक अधिकारी म्हणून पाठविण्यात आले. तर बंद पडणाऱ्या बस, रद्द होणारे मार्ग यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कामात कुचराई करणाऱ्या सुमारे २५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ‘पीएमपी’च्या विविध आगारातील दुपारच्या सत्रातील बस बंद पडत आहेत. विशेषतः ई बस चार्जिंगअभावी दुपारच्या सत्रात बंद पडत असल्याने त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. बस बंद पडल्याने फेरी रद्द होते. त्यामुळे ‘पीएमपी’चे उत्पन्नदेखील बुडते. यापूर्वी ‘पीएमपी’ प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करून बंद पडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. परिणामी आता ‘पीएमपी’ प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

काय करणार पालक अधिकारी?
- ‘पीएमपी’ प्रशासनाने आपल्या १७ विभाग प्रमुखांना १७ आगाराचे पालकत्व दिले आहे
- दुपारच्या सत्रात विभाग प्रमुख आपल्याला नेमून दिलेल्या आगारांना भेट देणार
- बंद पडणाऱ्या बस, चालक व मार्गाचा आढावा घेणार
- दोनहून अधिक वेळा बस बंद पडल्यास चालक व मेकॅनिक यांची चौकशी केली जाणार
- दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यावर थेट कारवाई

चालक-वाहकांवरही कारवाई
- ‘पीएमपी’ प्रशासनाने कामात कुचराईपणा करणारे चालक व मेकॅनिक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे
- काही वाहकाकडे तिकिटाच्या रकमेपेक्षा अधिकची रक्कम आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली
- सुमारे २५ कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली

दुपारच्या सत्रात बस बंद पडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मी स्वतः यावर लक्ष ठेवून आहे. यासाठी पालक अधिकारीदेखील नेमले आहेत. पीएमपीच्या नुकसानीस कारणीभूत ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. आतापर्यंत सुमारे २५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
- दीपा मुधोळ मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT