पुणे, ता. ४ : पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. शनिवारी (ता. ४) कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसने घट होणार असून त्यानंतर पुढील तीन दिवसांत हवामानात कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नसल्याने आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. शनिवारनंतर (ता. ५) पुढील दोन दिवस कमाल तापमान स्थिर राहणार असून शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. तर घाट विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरात शुक्रवारी (ता. ४) सकाळी ढगाळ वातावरण होते. तर दुपारी कडक ऊन पडले होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगर परिसरात हलक्या सरींनी हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना थोडा दिलासा मिळाली. शुक्रवारी शहरात २९ अंश सेल्सिअस इतके कमाल तर २२.५ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. पुढील तीन दिवस कमाल तापमानात कोणताही बदल होणार नाही. पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील तीन दिवस देखील घाट विभागामध्ये मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. त्यामुळे घाट विभागाला ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे.
असा आहे पावसाचा अंदाज...
पुणे आणि परिसरात शनिवारी (ता. ५) कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसने घट होणार असून कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश अंशतः ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारनंतर (ता. ६) पुढील दोन दिवस कमाल तापमान स्थिर राहणार असून २७ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले जाईल. आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.