पुणे

पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी खर्चाला मंजुरी

CD

पुणे, ता. ४ : पुणे शहरातील नदीवरील पूल, रेल्वेपूल, उड्डाणपूल, नाल्यांवरील कलव्हर्ट सुरक्षित आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्थायी समितीने एक कोटी १८ लाख रुपयांच्या निविदेला मान्यता दिली आहे.
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे १५ जून रोजी इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर ३२ जण जखमी झाले. या पार्श्वभूमीवर पुण्यातील पुलांची सुरक्षितता आणि स्थितीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या घटनेनंतर महापालिकेने पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू केले होते. या ऑडिटच्या अहवालानुसार पुलांच्या दुरुस्तीचे कामही सुरू केले आहे. पण त्याची गती खूप कमी आहे. पुणे शहरातील ८६ मोठे व १७० लहान पूल आहेत. त्यापैकी केवळ ३८ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. तर ३८ पैकी ११ पुलांवर दुरुस्तीचे काम झाले आहे. उर्वरित पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे बाकी आहे. यासाठी पुणे महापालिकेने निविदा मागवली होती. त्यात ‘स्ट्रक्टॉनिक कन्सल्टिंग इंजिनिअर्स’ यांनी सादर केलेली एक कोटी १८ लाखांची सर्वांत कमी दराची निविदा स्वीकारण्यात आली असून त्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
२०१३-१४ मध्ये पुणे महापालिकेने १८ पुलांचे, तर २०१८-१९ मध्ये १२ पूल आणि उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यानंतर २०२१ मध्ये २० वर्षांहून अधिक जुन्या ३८ पुलांचे ऑडिट करण्यात आले. सध्या शहरात ३२ नदीवरील पूल, २० उड्डाणपूल आणि नऊ रेल्वे उड्डाणपूल असे ६१ प्रमुख पूल आहेत, मात्र त्यापैकी ३८ पुलांचेच ऑडिट झाले असून, उर्वरित पुलांचे ऑडिट बाकी आहे. महापालिकेने उर्वरित पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. त्यात ‘स्ट्रक्टॉनिक कन्सल्टिंग इंजिनिअर्स’ या कंपनीची एक कोटी १८ लाख रुपयांची निविदा सर्वांत कमी दराची ठरली. स्थायी समितीने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT