पुणे

एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने फसवणूक

CD

पुणे, ता. ४ : एटीएममध्ये मदतीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकातील (सेव्हन लव्हज् चौक) एका बँकेच्या एटीएममध्ये चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाची ४० हजार रुपयांनी फसवणूक केली.
याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी (वय ६०, रा. नाना पेठ) बुधवारी दुपारी एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. त्यावेळी एक चोरटा त्यांच्या पाठोपाठ आत शिरला. त्याने मदतीच्या बहाण्याने त्यांच्याकडून डेबिटकार्ड आणि पिन क्रमांक घेतला. त्यानंतर चोरट्याने स्वतःचे डेबिट कार्ड मशिनमध्ये घालून तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले आणि त्यांच्या कार्डची अदलाबदल केली. ज्येष्ठ नागरिक पैसे न मिळाल्यामुळे घरी परतले. काही वेळात त्यांच्या खात्यातून ४० हजार रुपयांची रोकड काढण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी एटीएममधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी घेतले आहे.

कार्ड सुरू करण्याच्या बहाण्याने फसवणूक
बॅंकेचे नवीन एटीएम कार्ड सुरू करण्याच्या बहाण्याने चोरट्याने एका व्यक्तीची २९ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार बाजीराव रस्त्यावरील तुळशीबाग परिसरातील एटीएम केंद्रात गुरुवारी (ता. ३) घडला. याबाबत वाघोलीतील ३१ वर्षीय व्यक्तीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणुकीचे सत्र कायम
शहरात अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रमाण वाढत असून, यापूर्वीही वारजे, रास्ता पेठ, खडकी परिसरात ज्येष्ठांची फसवणूक झाली होती. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील चोरट्यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, पुन्हा अशा घटना घडत आहेत. नागरिकांनी एटीएम केंद्रामध्ये कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून मदत घेऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

LPG Crisis: दररोज ७५ लाख बुकिंग; तरीही गॅस तुटवडा नाही, साठेबाजी आणि काळाबाजारावर लगाम; केंद्राने दिले कडक निर्देश

Dry Fruits Price Hike: बदाम, पिस्ता, खजुर महागले! युद्धजन्य परिस्थितीमुळे सुक्या मेव्याची आवक ठप्प, दरवाढ किती?

Horoscope : उद्या १४ मार्च 'या' ४ राशींसाठी ठरणार गेमचेंजर; शेअर्सची गुंतवणूक देईल लाखोंचा फायदा, करियर अन् वैवाहिक जीवनाला कलाटणी

Palghar Crime : पालघर हादरले! मजुराला झाडाला उलटे टांगून जखमांवर चोळले तिखट, विटभट्टी मालकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT