पुणे

नऊ लाख वारकऱ्यांना आरोग्यसेवेचा लाभ

CD

पुणे, ता. ९ : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या नऊ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची आरोग्य विभागाने ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या उपक्रमांतर्गत विनामूल्य आरोग्य तपासणी करून आरोग्यसेवा दिली. परतीच्या मार्गावरही आरोग्यसेवा देण्यात आली.
दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला की लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्यसेवा पुरविण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखीदरम्यान वारकऱ्यांना प्रतिबंधात्मक, उपचारात्मक आरोग्यसेवा देण्यात आली. चित्ररथांच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण व जनजागृतीसाठी नावीन्यपूर्ण व कल्पक पद्धतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.

आरोग्यसेवेची वैशिष्ट्ये...
- पालखी सोहळा २०२५ साठी मनुष्यबळ : ४,३७६
- प्रत्येक ५ किमी अंतरावर ‘आपला दवाखाना’ : २०३
- वारीदरम्यान १०२ व १०८ रुग्णवाहिका उपलब्ध : ३३१
- महिला वारकऱ्यांसाठी रुग्णालयांत कार्यरत स्त्रीरोग तज्ज्ञ : १५
- पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्ष : ३७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Suraksha Bill: विधानसभेत 'जनसुरक्षा विधेयक' सादर; कायद्याची आता गरज का पडली? यात काय खास असेल?

Navi Mumbai News: वाहतुकीचे नियमच धाब्यावर, नो पार्किंगचे फलक नावापुरते; नागरिक हैराण पण पोलीस...

Suresh Dhas: 'त्याच' स्पॉटवर शेळके कुटुंबातल्या चौघांचा झाला होता अपघाती मृत्यू; आता सागर धसच्या गाडीने नितीन शेळकेचा जीव घेतला

Latest Maharashtra News Updates : विधीमंडळात आमदारांना धक्काबुक्की

Katraj News : येवलेवाडी-कोंढवा मेट्रो मार्गाला मंजुरी द्या; आमदार योगेश टिळेकर यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT