
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ऐरोली, घणसोली, कापेरखैरणे, सीबीडी, सीवूड, नेरुळ, जुईनगर, सानपाडा आदि भागातील वर्दळ असणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या कडेला होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे वाहतुककोंडी टाळण्यासाठी नो पार्किंग, समांतर पार्किंग, सम-विषम पार्किंगचे फलक बसविण्यात आले आहेत; परंतु वाहनचालकांकडून फलकावरील नियमांचे उल्लंघन होत असून, होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत.