पुणे, ता. ११ : न्या. रानडे बालक मंदिरात आईचे पूजन करत अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. तीन ते सहा वर्षातील मुलांवर संस्कार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम करण्यात आला. शाळेत प्रथमच प्रवेश घेतलेल्या प्ले ग्रुपच्या मुलांसाठी शाळेतील सभागृहात अग्निहोत्र देखील करण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुख्याध्यापिका अमिता दाते यांनी विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्त्व सांगितले. शाला समितीचे अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.