पुणे

विद्येचे प्रांगण

CD

सेंट जॉन्स स्कूलचा
वर्धापन दिन उत्साहात
पुणे : कॅम्प परिसरातील सेंट जॉन्स सेकंडरी स्कूलचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. लालबहादूर कांबळे, पदाधिकारी शुभदा केदारी, ॲड. विनायक पंडित, अनिल गडकरी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले. गुणवंतांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन आरती केवटे व अशफाक शेख यांनी केले. मुख्याध्यापक प्रणील कसोटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जमीर शेख, जयश्री भक्त, आरती पंडित, दिव्या भोरे, दीक्षा कदम आणि वैशाली साळवे यांनी विशेष प्रयत्न केले.
-----------------
धायरीतील शाळेत
गुरुपौर्णिमा उत्साहात
पुणे : धायरीतील महापालिकेच्या शाळा क्रमांक १६३-बी येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी भावना व्यक्त केल्या. त्यांच्या जीवनातील गुरूंचे महत्त्व सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना गुरूचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका जया कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सूत्रसंचालन स्वाती काळे व हरी गहेरवार यांनी केले.
............
कॅम्प एज्युकेशनच्या शाळेत
विद्यार्थिनींना गणवेश वाटप
पुणे : कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या कन्या शाळेमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ५० गरजू विद्यार्थिनींना गणवेश वाटप केले. ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष ज्योती पुंडे यांच्यातर्फे कन्या शिक्षण जागर उपक्रमांतर्गत उपक्रम राबविण्यात आला. गेली दहा वर्षे संस्थेचा हा उपक्रम सुरू आहे.
......
सिग्नेट पब्लिक स्कूल
पुणे : जेएसपीएमच्या हडपसर संकुलातील सिग्नेट पब्लिक स्कूलतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. श्री महर्षी व्यास यांच्या व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन झाले. पूर्व प्राथमिक विभागाच्या चिमुकल्यांनी मातृपूजन केले. त्यानंतर पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची स्पर्धा घेण्यात आली. चिमुकल्यांनी गुरुवंदना या गीतावर नृत्यही सादर केले. या वेळी प्राचार्या कल्पना निलाखे, टीएसएसएम ग्रुपचे अध्यक्ष गिरिराज सावंत, संस्थेचे विश्वस्त ऋषिराज सावंत, हडपसर संकुलाचे संचालक डॉ. वसंत बुगडे, सहसंचालक मारुती कालबांडे आदींनी मार्गदर्शन केले.
......
आगरकर हायस्कूल
पुणे : न्यू एज्युकेशन सोसायटीची मुलींचे आगरकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केले होते. विद्यार्थिनींनी गुरू शिष्यांच्या गोष्टी, कविता, गीत सादर केले. मुख्याध्यापिका मेघना कोष्टी यांनी विद्यार्थिनींना गोष्टी सांगितल्या व गुरूंची महती सांगितली.
........
नवीन मराठी शाळेत
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला दीपप्रज्वलन, सरस्वतीपूजन तसेच महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update: दोन दिवसांनंतर पावसाची उघडीप; आज-उद्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज

Gold Rate Today : सोने खरेदीचा विचार करत आहात? आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भावात बदल, जाणून घ्या स्वस्त झाले की महाग...

Girl Video : गरिबीचा शाप! रस्त्यावर फुलं विकणाऱ्या चिमुरडीसोबत रिक्षा चालकानं केलं घाणेरडं कृत्य, हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल..

तुम्हालाही समोसा, जिलेबी खायला आवडते? मग थांबा, कारण सरकार लठ्ठपणाविरोधात आखतंय नवा प्लॅन

Mumbai Indians ने जिंकले १३ वे विजेतेपद! अंतिम सामन्यात मॅक्सवेलच्या संघाला चारली धूळ; रुशील उगारकर ठरला हिरो

SCROLL FOR NEXT