पुणे

टेक सागा उपक्रमात माहिती-तंत्रज्ञानावर संवाद

CD

पुणे, ता. १२ : देशातील विविध उद्योगांमधील माहिती आणि तंत्रज्ञान हे सुरक्षित, शाश्वत आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर्स असोसिएशन, पुणे (सीआयओ) यांच्यातर्फे ‘टेक सागा २०२५’ हा उपक्रम उत्साहात झाला.
या उपक्रमासाठी देशातील २५० तंत्रज्ञान अधिकारी उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन अंतराळवीर विंग कमांडर राकेश शर्मा, ‘सीआयओ’ असोसिएशनचे मुख्याधिकारी उमेश मेहता यांच्या हस्ते झाले. यावेळी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलत्या गरजांवर संवाद साधण्यात आला. तसेच तंत्रज्ञानाचा वापर केवळ व्यावसायिक प्रगतीसाठीच नव्हे, तर पर्यावरणरक्षण, सायबर सुरक्षितता आणि ऊर्जा कार्यक्षमतेसाठी कसा केला जाऊ शकतो, यावर विचारमंथन झाले. त्याचबरोबर तंत्रज्ञान धोरणे, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सुरक्षा आणि डिजिटल परिवर्तन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
याप्रसंगी शर्मा यांनी अवकाश यात्रेबद्दलची रोमांचक माहिती दिली. या कार्यक्रमानिमित्त देश पातळीवर आयोजित प्रश्नमंजुषेत भाग घेतलेल्या व विजेत्या तंत्रज्ञान अधिकाऱ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन सजिथ चक्किंगल यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! वर्षा गायकवाडांकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी; 'या' तीन नामवंतांनाही मिळाली संधी

खलनायक ते राजकारणी: ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचा प्रवास थांबला; 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Bar Strike : मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरातील बार उद्या राहणार बंद; HRAWI चा जाहीर पाठिंबा, काय आहे कारण?

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

Latest Marathi News Updates : लाडक्या बहिण योजनेमुळे विकास निधी येण्यास विलंब - मंत्री दत्तात्रय भरणे

SCROLL FOR NEXT