पुणे

वेश्याव्यवसायास नकार दिल्याने बांगलादेशी मुलीला मारहाण

CD

पुणे, ता. १३ : एका बांगलादेशी अल्पवयीन मुलीला कुंटणखान्यात डांबून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे, परंतु मुलीने त्यास नकार दिल्याने तिला पट्ट्याने मारहाण करण्यात आली. याबाबत सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाल्यानंतर सहकारनगर पोलिसांच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी दोन दलालांना अटक करण्यात आली असून, तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही आरोपी तमन्ना ऊर्फ पारूल मुख्तार शेख हिच्या ओळखीची आहे. तमन्नाने तिला पुण्यात ब्युटी पार्लरमध्ये चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार ती बंगळूरूमध्ये आली. तिथे तिला रकीब खान या आरोपीकडे ठेवण्यात आले. मात्र, नोकरी न देता तिला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुलीने विरोध केला असता, तमन्ना शेख आणि अभिषेक प्रकाश संथेबेन्नूर (रा. हुबळी, कर्नाटक) यांनी तिला पुण्यात आणले. सहकारनगरमधील एका खोलीत डांबून तिला वेश्याव्यवसायास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. तिने वारंवार नकार दिल्यानंतर पट्ट्याने मारहाण करण्यात आली.

खोलीत डांबलेल्या अवस्थेतच मुलीने मोबाइलद्वारे बांगलादेश पोलिसांशी संपर्क साधला. बांगलादेश पोलिसांनी तत्काळ पुण्यातील एका सामाजिक संस्थेशी संपर्क साधला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सहकारनगर पोलिसांना माहिती दिली. अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राहुल आवारे, पोलिस निरीक्षक सुरेखा चव्हाण यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री शोधमोहीम राबवली. शनिवारी पहाटे अभिषेक संथेबेन्नूर आणि तमन्ना शेख यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पीडित मुलीची सुटका करण्यात आली. आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. तिसरा आरोपी रकीब खान फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT