पुणे

गोकुळनगरमध्ये कोयत्यांनी हल्ला करणाऱ्यांना अटक

CD

पुणे, ता. १५ : पूर्ववैमनस्यातून गोकुळनगरमध्ये एका तरुणावर कोयते आणि तलवारींनी हल्ला केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सात सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, अन्य दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू ऊर्फ राजा संगप्पा गुळकर (वय १८), तन्वीर अक्रम शेख (वय १९), सुरेंद्र ऊर्फ अमर भुवनेश्वर साव (वय १९), कैलास बाबूराव गायकवाड (वय २२), कविराज ऊर्फ केडी सुदाम देवकाते (वय १९), प्रेम ऊर्फ पप्या यल्लेश घुंगरगी (वय २२), यश ऊर्फ मास अंबर सोनटक्के (वय १८, सर्व जण रा. साईनगर, कोंढवा बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण ११ जुलै रोजी रात्री गोकुळनगर चौकातून एसबीआय कॉर्नरजवळून घरी जाताना त्याच्यावर टोळक्याने कोयते, तलवारींनी हल्ला केला. हल्लेखोरांनी डोक्यात, पाठीवर, कमरेखाली आणि हातांवर वार करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तसेच तलवारी हवेत भिरकावत नागरिकांमध्ये दहशत पसरवली.
या प्रकरणात वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर, पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप आणि वर्षा देशमुख यांनी पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तपासादरम्यान आरोपी हे साळवे गार्डनमागील पडीक खोलीत लपून बसल्याची माहिती पोलिस अंमलदार सूरज शुक्ला, अभिजित जाधव, विजय खेंगरे, राहुल शेलार यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकांनी परिसराला वेढा घालून आरोपींना अटक केली. न्यायालयाने आरोपींना १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पंकज खोपडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT