पुणे

टूर व्यावसायिकाला जम्मूत सुखद अनुभव

CD

पुणे, ता. १६ ः कधी-कधी अडचणीच्या क्षणी अनोळखी चेहराही आपलासा वाटतो. असाच एक हृदयस्पर्शी अनुभव पुण्यातील कोंढवा येथील एका टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला जम्मूमध्ये आला. सव्वादोन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग रेल्वे प्रवासात हरवली, पण जम्मूच्या जीआरपी पोलिसांनी ती शोधून दिली व विश्वास आणि माणुसकीचा धडाही दिला.
कोंढव्यातील एक टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिक १२ यात्रेकरूंच्या ग्रुपसह अमरनाथ यात्रेसाठी गेले होते. ऑनलाइन व्यवहारातील अडचणी लक्षात घेता, अचानक वैद्यकीय किंवा आपत्कालीन गरज भासल्यास उपयोगी पडावेत म्हणून त्यांनी सव्वादोन लाखांची रोकड एका बॅगेत ठेवली होती. १५ जुलै रोजी सायंकाळी जम्मू रेल्वे स्थानकावर गडबडीत ही बॅग हरवली.
जम्मू जीआरपीच्या सतर्कतेमुळे तपासणीदरम्यान ती बॅग सापडली. पोलिसांनी बॅग उघडून पाहिली असता त्यात सव्वादोन लाख रुपये होते. तपासादरम्यान योग्य ओळख पटवून ती बॅग संबंधित व्यावसायिकाकडे परत करण्यात आली. ही बाब केवळ एका प्रवाशासाठी नाही, तर देशभरातील प्रवाशांसाठी पोलिस प्रशासनाच्या विश्वासार्हतेचा आणि मानवतेचा एक आदर्श ठरला.

मनापासून आभार आणि अभिमानही!
या सुखद अनुभवाबद्दल संबंधित टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिक म्हणाले, ‘‘बॅग हरविल्यानंतर काळजाचा ठोका चुकला होता. मात्र, जम्मूतील जीआरपी पोलिसांनी ती शोधून दिली, हे मी कधीही विसरणार नाही. आम्हा सर्वांना तेथील पोलिस आणि स्थानिक नागरिकांचेही भरभरून सहकार्य मिळाले. महाराष्ट्रातील पर्यटकांनी जम्मूला भीती न बाळगता जरूर भेट द्यावी. त्यामुळे तेथील पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND : रिषभ पंतकडून प्रेरणा घेत भारताच्या महिला क्रिकेटरनेही एकाहाताने मारला 'सुपर सिक्स', Video Viral

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

SCROLL FOR NEXT