पुणे, ता. १७ : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीत राज्यातील दोन लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालये मिळाली (ॲलॉट) आहेत. या फेरीत पुणे विभागातील ४३ हजार ७०२ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. दुसऱ्या फेरीचा कट-ऑफ देखील जाहीर केला आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील अकरावीच्या प्रवेशासाठी राज्यात केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये नऊ हजार ४८३ कनिष्ठ महाविद्यालयांच्या १९ हजार ३२४ शाखा प्रकार आणि अनुदान प्रकारनिहाय तुकड्यांची संख्या आहे. या फेरीत विज्ञान शाखेत एक लाख २९ हजार ३५, वाणिज्य शाखेत ६९ हजार ४४२ आणि कला शाखेत ५३ हजार ३२७ विद्यार्थ्यांना महाविद्यालये ॲलॉट झाली आहेत तर पुणे विभागात २५ हजार ६२३ विद्यार्थ्यांना विज्ञान, १० हजार ९१४ विद्यार्थ्यांना वाणिज्य आणि सात हजार ८४ विद्यार्थ्यांना कला शाखेत प्रवेशासाठी महाविद्यालये मिळाली आहेत.
संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना १८ ते २१ जुलैपर्यंत मुदत दिली आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
महाविद्यालये ॲलॉट झालेले विद्यार्थी
तपशील : विज्ञान : वाणिज्य : कला
पुणे विभाग : २५,६२३ : १०,९९४ : ७,०७५
मुंबई विभाग : २८,८२२ : ४३,३५४ : ७,२२७
संपूर्ण राज्य : १,२९,०३५ : ६९,४४२ : ५३,३२७
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये : ९,४८३
प्रवेशासाठी नोंदणी केलेले विद्यार्थी : १४,१०,६१२
प्रवेशाच्या जागा आणि झालेले प्रवेश
तपशील : उपलब्ध जागा : झालेले प्रवेश : रिक्त जागा
‘कॅप’ अंतर्गत : १७,६०,०९८ : ४,३१,६१५ : १३,२८,४८३
‘कोट्या’अंतर्गत :३,७२,८६२ : ७५,६७३ : २,९७,१८९
एकूण : २१,३२,९६० : ५,०७,२८८ : १६,२५,६७२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.